Mopa Police Station
Mopa Police Station Dainik Gomantak
गोवा

Mopa Police Station: चकचकीत, पॉश मोपा विमानतळाचे पोलिस स्टेशन अद्याप पत्र्याच्या शेडमध्येच

Pramod Yadav

Mopa Police Station: उत्तर गोव्यातील मोपा येथे नव्याने झालेले आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी विमानतळाचे उद्घाटन झाले व 05 जानेवारी 2023 पासून विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली.

अद्याप विमानतळाचे काम सुरू असले तरी, अतिशय अधुनिक आणि पॉश मोपा विमानतळाचे पोलिस स्टेशन अद्याप पत्र्याच्या शेडमध्येच आहे. यामुळे येथे सेवा बजावत असलेल्या पोलिसांना विविध त्रास सहन करावा लागत आहे.

मोपा विमानतळवरील पोलिस स्टेशन पत्र्याच्या शेडमध्येच आहे. पॉश विमानतळाचे पोलिस ठाण्याची अशी अवस्था का? असा सहाजिक प्रश्न उपस्थित केला आहे.

तात्पुरते असले तरी पत्र्याच्या शेडमध्ये काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना असह्य उन्हामुळे होणारा उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, परिसरात असलेल्या धुळीचा त्रास देखील पोलिस कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

धुळ आरोग्यासाठी अपायकारक असून, त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होतात.

मोपा पोलिस ठाण्यात काम करणारे पोलिस कर्मचारी याबाबत तक्रार करत नाहीत पण, त्यांना उकाड्याचा आणि धुळीचा खुप त्रास होत आहे. तसेच, पोलिस ठाण्याचा मोठा भाग खुला असल्याने सातत्याने धुळ यात येते. यामुळे त्यांना व्यवस्थितपणे जेवण देखील करता येत नाही. असे येथील स्थानिक आणि समाजसेवक म्हणतात.

विमानतळाचे उद्घाटन झाले पण, प्रशासनाने येथील कायदा सुव्यवस्था पाहणाऱ्या पोलिसांना व्यवस्थित पोलिस स्टेशन दिले नसल्याचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिस ठाण्यात ना एसी आहेत ना फॅन आहेत ते सुरळीतपणे कार्यरत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT