IMD Goa Rain Update: गोव्यात उद्यापासून म्हणजेच मंगळवारपासून (दि.14) पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तविला आहे. विजांच्या गडगडाटासह राज्यात पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. यामुळे कडकडीत उन्हामुळे त्रस्त नागरिकांना काहीसा दिलसा मिळणार आहे.
वातावरणीय आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे तसेच, कोकण कर्नाटक भागात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्याने 14 ते 16 दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे. या तीन दिवसांत राज्यातील कमाल तापमानात 2 ते 3 अंशाने घट होण्याची शक्यता आहे.
गेले दोन आठवडे गोव्यात कडक उष्मा जाणवत होता. पण, हवेत बाष्पही निर्माण झाले आहे. ढग निर्माण होत असल्याने येत्या तीन दिवसांत पावसाची शक्यता आहे. असे वेधशाळेने म्हटले आहे.
दरम्यान, रविवारी राज्यातील तापमान अधिकच असल्याचे दिसून आले. रविवारी काणकोण येथे सर्वाधिक 39.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
मुरगावमध्ये रविवारी 36.2 अंश सेल्सिअस, पणजी 36 अंश सेल्सिअस, वाळपई 39.4, ओल्ड गोवा 38.7, पेडणे 37.7 तर, मडगावमध्ये 35.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.