गोव्यातील भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज नेहमीच या ना त्या कारणांने चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत.
भाजपमध्ये धार्मिकेतेला स्थान नसून सर्व नेते भारतीय म्हणून नेतृत्व करत असतात अशा आशयाचा मजकूर त्यांनी पोस्ट केला होता. यावरून अनेकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
"तुम्ही भाजपचा कॅथलिक चेहरा आहात का? असा प्रश्न मला कोणीतरी केला. भाजपमध्ये हिंदू, मुस्लिम, कॅथलिक, शिख असे चेहरे नाहीत. भाजपमध्ये आम्ही सर्व भारताचे चेहरे आहोत," असे मी त्याला उत्तर दिले.
अशा आशयाचा मजकूर भाजपचे नेते सावियो रॉड्रिग्ज यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे. यावर सुमारे 362 लोकांनी प्रतिक्रिया दिल्या असून, 5.7 हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे. यावर अनेक समर्थनात तर अनेकांनी खोचक आणि विरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने सावियो यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, तुम्ही रामाला मानणारे आहात तर, श्री रामाच्या नातवांची नावे सांगा? असा प्रश्न विचारला.
सावियो यांनी या युजरला LOL (Laugh Out Loud) अशी प्रतिक्रिया दिली आहे. 'तुम्ही मला श्री रामाचा उपदेश काय आहे सांगा, तुम्हाला माहिती आहे का बघु. किंवा अब्राहम यांच्या मुलांची नावे सांगा,' अशी प्रतिक्रिया सावियो यांनी दिली आहे.
जोकर सावियो, अशा दिलेल्या एका प्रतिक्रियेला राहुल गांधी यांच्यापेक्षा मोठा जोकर कोणीही असू शकत नाही, तो मान त्यानांच आहे, अशी प्रतिक्रिया सावियो यांनी दिली आहे.
मग ते (मोदी) मंदिरात का जातात? अशी एक प्रतिक्रिया एका युजरने दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या श्रद्धांचा अवलंब करु नये असे तुमचे मत आहे का? त्यात चुकीचे काय आहे? मी सुद्धा मला जायचं त्यावेळी मी चर्चमध्ये जातो, पण राजकारणात आहे म्हणून मी जायचं बंद करावे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एका युजरने भाजपमध्ये मला सर्व सर्व वाईट चेहरे दिसतात, अशी प्रतिक्रिया दिली. सावियो आणि जांभईचा शब्द वापरुन त्याकडे दुर्लेक्ष केले.
पैसे दुप्पट करण्यासाठी म्हणून फक्त तुम्ही भाजपमध्ये आहात, बरोबर ना? असा खोचक प्रश्न एका युजरने केला.
याला सावियो यांनी LOL अशी प्रतिक्रिया दिली आहे. सरस्वतीची पूजा करणाऱ्यांसाठी पैसा कधीच समस्या नसते. आई लक्ष्मी अशा लोकांना नेहमीच आशिर्वाद देत असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, भाजपच्या सर्वच राजकीय नेत्यांनी त्यांच्या सोशल मिडिया हँडलच्या नावात 'मोदी का परिवार' असा बदल केला आहे. लालू प्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप नेत्यांनी सोशल मिडियावरील नावात बदल केले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.