

पणजी: गोव्यातील 50 जिल्हा पंचायत जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत राज्यावर आपले वर्चस्व कायम राखले. सोमवारी (22डिसेंबर) जाहीर झालेल्या निकालानुसार, भाजपने (BJP) 50 पैकी 30 जागांवर विजय मिळवून 'सर्वात मोठा पक्ष' होण्याचा बहुमान पटकावला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या विजयाद्वारे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक भक्कम पाया रचला असल्याचे पाहायला मिळतंय.
दरम्यान, या विजयानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले. "हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि राज्य सरकारच्या विकासकामांवर जनतेने दाखवलेला विश्वास आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ग्रामीण भागातील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे, या निवडणुकीत (Election) काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना मोठी हार पत्करावी लागली आहे. विरोधी पक्षांमध्ये एकी नसल्याचा आणि युती न केल्याचा थेट फायदा भाजपला झाला आहे. काँग्रेसला केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले असून, अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांनी काही जागांवर अनपेक्षित विजय मिळवला आहे. विरोधकांच्या विखुरलेल्या मतांमुळे भाजपचा विजयाचा मार्ग सोपा झाल्याचे चित्र निकालातून स्पष्ट दिसत आहे.
निकालांची आकडेवारी पाहिली तर भाजपला 30, काँग्रेसला 8, अपक्ष उमेदवारांना 5, मगोपला 2, तर आम आदमी पार्टी (AAP) ला 1, रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (RGP) ला 1 आणि गोवा फॉरवर्ड पार्टीला (GFP) 1 जागा मिळाली. या निकालातून हे स्पष्ट झाले की, ग्रामीण भागातील जनतेने 'डबल इंजिन' सरकारच्या विकासकामांवर आपला विश्वास कायम ठेवला.
1. हरमल- राधिका पालेकर (अपक्ष)
2. मोरजी- तारा हडफडकर (MGP)
3. धारगळ- श्रीकृष्ण रवींद्र हरमलकर (भाजप)
4. तोरसे- सिद्धेश पेडणेकर (भाजप)
5. शिवोली- महेश्वर मनोहर गोवेकर (भाजप)
6. कोलवाळ- कविता किरण कांदोळकर (अपक्ष)
7. हळदोण- मेरी उर्फ मारिया मिनेझिस (काँग्रेस)
8. शिरसई- सागर सुधाकर मौलनकर (भाजप)
9. हणजूण- नारायण लाडू मांद्रेकर (भाजप)
10. कळंगुट - कार्मेलिना फर्नांडिस (काँग्रेस)
11. सुकूर- अमित देविदास अस्नोडकर (भाजप)
12. रेइस-मागोस- रेश्मा बांदोडकर (भाजप)
13. पेन्हा दि फ्रँका- संदीप साळगावकर (भाजप)
14. सांताक्रूझ- इस्पेरांका ब्रागांझा (RGP)
15. ताळेगाव- रघुवीर कुंक्कळीकर (भाजप)
16. चिंबल- गौरी प्रमोद कामत (भाजप)
17. खोर्ली- सिद्धेश श्रीपाद नाईक (भाजप)
18. सेंट लॉरेन्स- तृप्ती विश्वनाथ बकाल (RGP)
19. लाटंबार्से- पद्माकर अर्जुन मलिक (भाजप)
20. कारापूर सवर्ण- महेश अनंत सावंत (भाजप)
21. मये -कुंदा मांद्रेकर (भाजप)
22. पाळी- सुंदर नाईक (भाजप)
23. होंडा- नामदेव बाबल चारी (भाजप)
24. केरी- नीलेश शांभा परवार (भाजप)
25. नगरगाव- प्रेमनाथ दळवी (भाजप)
26. उसगाव-गांजे- समिक्षा वामन नाईक (भाजप)
27. बेतकी- कंदोला सुनील जलमी (अपक्ष)
28. कुडतरी- प्रितेश प्रेमानंद गावकर (भाजप)
29. वेलिंग-प्रिवोळ- दामोदर नाईक (भाजप)
30. कुळे- गणपत नाईक (एमजीपी)
31. बोरी- पूनम चंद्रकांत सामंत (भाजप)
32. शिरोडा- डॉ. गौरी सुभाष शिरोडकर (भाजप)
33. राय- इनासिना लुइस पिंटो (GFP)
34. नुवे- अँथनी ब्रागांझा (काँग्रेस)
35. कोलवा- अँटोनियो फर्नांडिस (आप)
36. वेळ्ळी- जॉन बेडा पेड्रो परेरा (अपक्ष)
37. बाणावली- वियाना वलंकानी बाप्टिस्टा (आप)
38. दवर्ली- फ्लोरिना डॅनी फर्नांडिस (काँग्रेस)
39. गिरदोली- संजय वेळीप (काँग्रेस)
40. कुडतरी- एस्ट्रा रँझिले दा सिल्वा (काँग्रेस)
41. नावेली- मलिफा कार्डोझो (काँग्रेस)
42. सावर्डे- मोहन परशुराम गावकर (भाजप)
43. धारबांदोडा- रुपेश रामनाथ देसाई (भाजप)
४४. रिवण- राजश्री राजेश गावकर (भाजप)
45. शेल्डे- सिद्धार्थ श्रीनिवास देसाई (भाजप)
46. बार्से- अंजली अर्जुन वेळीप (भाजप)
47. कोला- सुमित्रा पागी (काँग्रेस)
48. पैंगिण- अजय लोलेनकर (भाजप)
49. सांकवाळ- सुनील महादेव गावस (भाजप)
50. कुठ्ठाळी- मार्सियाना वास (अपक्ष)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.