Swiggy Instamart Report: ना चिकन, ना पनीर... या ग्राहकाने फक्त 'कंडोम'वर खर्च केले लाखो रुपये; स्विगी इन्स्टामार्टचा थक्क करणारा रिपोर्ट!

Swiggy Instamart 2025 Report: वर्ष संपायला काही दिवस उरले असतानाच 'स्विगी इंस्टामार्ट'ने 2025 चा आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला.
Swiggy Delivery
Swiggy Delivery Dainik Gomantak
Published on
Updated on

Swiggy Instamart 2025 Report: वर्ष संपायला काही दिवस उरले असतानाच 'स्विगी इंस्टामार्ट'ने 2025 चा आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. 'हाऊ इंडिया इंस्टामार्टेड 2025' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या या अहवालात भारतीयांच्या खरेदीच्या सवयींबद्दल अनेक धक्कादायक आणि रंजक बाबी समोर आल्या आहेत. यात सर्वात जास्त चर्चा होत आहे ती चेन्नईच्या एका यूजरची, ज्याने वर्षभरात कंडोम खरेदी करण्यासाठी चक्क 1 लाख रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली.

चेन्नईच्या यूजरचा 'कंडोम' रेकॉर्ड

अहवालानुसार, चेन्नईमधील या अज्ञात युजरने वर्षभरात तब्बल 228 वेळा कंडोमच्या वेगवेगळ्या ऑर्डर्स दिल्या. या सर्व ऑर्डर्सची एकूण किंमत 1,06,398 रुपये इतकी भरली. क्विक कॉमर्स ॲप्सवर कंडोम हे सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या उत्पादनांपैकी एक ठरले. अहवालात असे म्हटले की, प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या दर 127 ऑर्डर्सपैकी एका ऑर्डरमध्ये कंडोमचा पॅकेट असतोच. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यात कंडोमच्या विक्रीत गेल्या वर्षाच्या तुलनेत 24 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

Swiggy Delivery
Online Food Ordering Platforms: Zomato, Swiggy वरून जेवण ऑर्डर करणं महाग, कोणतं प्लॅटफॉर्म देतंय स्वस्त डिलिव्हरी सेवा? जाणून घ्या

आयफोन आणि सोन्याचीही 'झटपट' खरेदी

आता लोक केवळ दूध-भाजीपाल्यासाठीच नाही, तर महागड्या वस्तूंसाठीही 'इंस्टामार्ट'वर अवलंबून असल्याचे दिसते. बंगळुरुच्या एका यूजरने एकाच वेळी तीन आयफोन-17 (iPhone 17) खरेदी करण्यासाठी 4.3 लाख रुपये खर्च केले. या विक्रमी खरेदीमुळे तो 2025 मधील एकाच ऑर्डरवर सर्वाधिक खर्च करणारा ग्राहक ठरला. तसेच, मुंबईतील एका ग्राहकाने चक्क 15.16 लाख रुपयांचे सोने या ॲपवरुन खरेदी केले, तर हैदराबादमध्ये एका युजरने 31000 रुपयांचे गुलाब मागवले.

रेड बुल आणि प्रोटीनची क्रेझ

मुंबईतील एका अकाऊंटवरुन चक्क 'रेड बुल शुगर फ्री' या एनर्जी ड्रिंकवर वर्षभरात 16.3 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. आरोग्याप्रति जागरुक असलेल्या नोएडा मधील एका जिम प्रेमीने वर्षभरात 1343 प्रोटीन प्रॉडक्ट्स मागवले असून त्यावर 2.8 लाख रुपये खर्च केले आहेत. तंत्रज्ञान प्रेमी एका युजरने ब्लूटूथ स्पीकर, एसएसडी आणि रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनरवर एकाच वेळी 2.69 लाख रुपये उडवले.

Swiggy Delivery
Swiggy Layoffs: स्विगीमध्ये काम करणाऱ्यांना मोठा झटका, लवकरच मिळणार नारळ!

बंगळुरुमध्ये केवळ महागड्या वस्तूंचीच खरेदी झाली नाही, तर तेथील एका ग्राहकाने आपल्या उदारतेने सर्वांचे लक्ष वेधले. या ग्राहकाने वर्षभरात डिलिव्हरी पार्टनर्संना चक्क 68,600 रुपये केवळ 'टिप' (Tips) म्हणून दिले आहेत. चेन्नईतही एका ग्राहकाने आपल्या पाळीव प्राण्यांच्या खाद्यावर 2.41 लाख रुपये खर्च करुन 'पेट पेरेंट ऑफ द इयर' हे अनधिकृत जेतेपद पटकावले.

Swiggy Delivery
शुभमन गिलने एलन मस्कला केली Swiggy विकत घेण्याची विनंती

दुसरीकडे, सर्वात छोटी ऑर्डर ही बंगळुरुमधूनच आली होती, जिथे एका यूजरने केवळ 10 रुपयांची एक प्रिंटआउट मागवली होती. या अहवालावरुन हे स्पष्ट होते की, भारतीयांसाठी क्विक कॉमर्स आता केवळ आपत्कालीन सेवा राहिली नसून ती दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com