Team India: वर्ल्ड कप टीम जाहीर होताच टीम इंडियाला बसला मोठा धक्का; 'या' स्टार खेळाडूनं तडकाफडकी घेतली निवृत्ती!

Krishnappa Gowtham Retirement: कृष्णप्पा गौतम याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Krishnappa Gowtham Retirement
Krishnappa Gowtham RetirementDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील एक प्रभावी नाव आणि आयपीएलमध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा कर्नाटकचा खेळाडू कृष्णप्पा गौतम याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या १४ वर्षांपासून क्रिकेटच्या मैदानावर आपल्या ऑफ-स्पिन गोलंदाजीने आणि स्फोटक फलंदाजीने छाप पाडणाऱ्या या खेळाडूने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सुरेश रैनाच्या विकेटने कारकिर्दीची सुरुवात

कृष्णप्पा गौतमने २०१२ मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध रणजी ट्रॉफीतून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने सुरेश रैनासारख्या दिग्गज फलंदाजाला बाद करून आपल्यातील कौशल्याची झलक दाखवली होती.

मात्र, २०१६-१७ चा रणजी हंगाम त्याच्या कारकिर्दीतील खरा 'टर्निंग पॉईंट' ठरला. त्या हंगामात त्याने ८ सामन्यांत २७ बळी घेत निवडकर्त्यांचे लक्ष वेधले होते. याच काळात त्याने आसामविरुद्ध पहिले प्रथम श्रेणी शतक झळकावून आपण केवळ गोलंदाज नसून एक उत्तम फलंदाज असल्याचेही सिद्ध केले.

Krishnappa Gowtham Retirement
Goa Special Train: ख्रिसमस, न्यू ईयरनिमित्ताने गोव्यासाठी धावणार विशेष ट्रेन; पंजाब, दिल्ली, गुजरात मुंबईतून मडगाव गाठणार, बुकिंग सुरु

आयपीएल लिलावात रचला होता इतिहास

कृष्णप्पा गौतमची खरी ओळख भारतीय चाहत्यांना आयपीएलमुळे झाली. २०२१ च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) त्याला तब्बल ९.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यावेळी तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा 'अनकॅप्ड' (ज्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही असा) खेळाडू ठरला होता.

चेन्नईव्यतिरिक्त त्याने मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांसारख्या मोठ्या संघांचे प्रतिनिधित्व केले. आयपीएलमध्ये त्याने २४७ धावा करण्यासोबतच १३ महत्त्वपूर्ण विकेट्सही घेतल्या.

Krishnappa Gowtham Retirement
Goa Opinion: लईराई जत्रेतील चेंगराचेंगरी, नाईटक्लबमधील 25 मृत्यू; यंत्रणांच्या उत्तरदायित्वाची निश्चिती ही काळाची गरज

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

घरगुती क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही गौतमला भारतीय संघात जास्त संधी मिळाली नाही. त्याने टीम इंडियासाठी केवळ एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला, ज्यामध्ये त्याने एक विकेट घेतली.

वयाची ३६ वर्षे पूर्ण केल्यानंतर आणि वाढती स्पर्धा पाहता, गौतमने आता युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी आणि नवीन प्रवासाला सुरुवात करण्यासाठी निवृत्तीचा मार्ग निवडला आहे. कर्नाटक क्रिकेटच्या सुवर्णकाळात त्याचा मोलाचा वाटा राहिला असून, त्याच्या निवृत्तीमुळे कर्नाटक संघात एका अनुभवी अष्टपैलू खेळाडूची पोकळी निर्माण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com