Gadkari On Parrikar: जेव्हा मनोहर पर्रीकरांचे नाव भाजपच्या अध्यपक्षपदासाठी चर्चेत होते, गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा

Gadkari On Parrikar: मनोहर पर्रीकर यांच्या नावाचा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देखील विचार झाला होता.
Nitin Gadkari On Manohar Parrikar
Nitin Gadkari On Manohar ParrikarDainik Gomantak
Published on
Updated on

Gadkari On Parrikar

गोवा आणि देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव म्हणून दिवंगत मनोहर पर्रीकर यांची ओळख आहे. राज्याचे मुख्यमंत्री होण्यासह त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून देखील जबाबदारी संभाळली होती.

त्यांच्याच कार्यकाळात भारतीय सेनेच्या जवानांनी उरी येथे सर्जिकल स्ट्राईक केला होता. पण, मनोहर पर्रीकर यांच्या नावाचा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देखील विचार झाला होता. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मुलाखतीत माहिती दिली आहे.

2009 मध्ये भाजपचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा विचार झाला. त्यावेळी नरेंद्र मोदी, शिवराज सिंह चौहान, मनोहर पर्रीकर आणि नितीन गडकरी यांची नावे समोर आली.

दरम्यान, मनोहर पर्रीकर गोव्याच्या राजकारणात व्यस्त होते, शिवराज सिंह चौहान मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री होते आणि नरेंद्र मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री पदावर कार्यरत होते. त्यामुळे नैसर्गिकपणे माझं नाव समोर आलं, असे गडकरी म्हणाले.

मला पक्षाध्यक्ष करण्यापेक्षा सरचिटणीस करावे अशी विनंती मी केली होती. दिल्लीत माझी ओळख नाही, लोकांचा परिचय नाही पण, वरिष्ठांनी सध्या तुम्हालाच धुरा संभाळावी लागेल असा आग्रह धरला आणि भाजपची राष्ट्रीय जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

भाजपमध्ये नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी असे दोन गट असल्याची चर्चा जेव्हा तुमच्यापर्यंत येते त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

'मला दु:ख होते, अनेकवेळा माध्यमांमध्ये आमच्या दोघांमध्ये वाद होईल असे वृत्त प्रसिद्ध केले जाते. पण, आमच्या दोघांमध्ये असा कोणताही वाद नाही. समाज्यात रिकाम्या बसलेल्या लोकांना काही उद्योग नाही ते अशाप्रकारची अर्थ नसलेली विश्लेषण करत असतात,' असे नितीन गडकरी म्हणाले. आमचा पक्ष हा एक शिस्त असलेला राजकीय पक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे.

Nitin Gadkari On Manohar Parrikar
South Goa BJP Candidate: दक्षिण गोव्यातून भाजपकडून महिला उमेदवार? 'या' हिंदुत्ववादी चेहऱ्याची चर्चा

'मंत्री, आमदार कधीतरी माजी होत असतात पण पक्षाचा कार्यकर्ता कधी माजी होत नाही तो कायम कार्यकर्ताच असतो. माझी नेहमी समाजासाठी काम करण्याची भावना राहिली असून, तीच भावना आजही कायम आहे, माझी पंतप्रधान होण्याची इच्छा नाही,' असे स्पष्टीकरण गडकरींनी यावेळी दिले.

संजय जोशींच्या वरून मोदी आणि गडकरी यांच्यात वाद झाल्याचा उल्लेख केला असता, जुन्या गोष्टी संपल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आम्ही राष्ट्रनिर्माणाच्या दिशेने कार्य करत असल्याचे गडकरी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com