Gold-Silver Prices: सोन्या-चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ! लग्नसराईत ग्राहकांना घाम; एका दिवसात चांदीच्या दरात 'इतक्या' हजारांची वाढ

Gold-Silver Prices: जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत सुरु असलेली विक्रमी दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाहीये.
Today Gold Price
Gold PriceDainik Gomantak
Published on
Updated on

Gold-Silver Prices: जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत सुरु असलेली विक्रमी दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाहीये. सोमवारी (22 डिसेंबर) सोन्या आणि चांदीच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेत आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर गाठला. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 1685 रुपयांची वाढ झाली, तर चांदीने 10,400 रुपयांची छप्परफाड वाढ नोंदवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

सोन्याचा नवा उच्चांक

दिल्लीतील (Delhi) सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीत सोमवारी मोठी वाढ झाली. सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,38,200 रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सोन्याचा भाव 1,36,515 रुपयांवर स्थिरावला होता. मात्र, जागतिक बाजारपेठेत मागणी वाढल्याने आणि डॉलरच्या अस्थिरतेमुळे सोन्याने अवघ्या दोन दिवसांत ही मोठी मजल मारली. लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.

Today Gold Price
Gold And Silver Price: सोन्या-चांदीच्या दराला मोठा ब्रेकडाऊन! 'एवढ्या' हजारांनी स्वस्त झाली चांदी, सोन्याच्याही दरात घसरण; ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी

चांदीची विक्रमी घोडदौड

सोन्यापेक्षाही (Gold) अधिक वेगाने चांदीच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे. सोमवारी चांदीच्या दराने 10,400 रुपयांची 'बंपर' वाढ नोंदवत प्रति किलो 2,14,500 रुपयांचा नवा विक्रम प्रस्थापित केला. विशेष म्हणजे, गेल्या शुक्रवारी चांदीच्या दरात 3500 रुपयांची घसरण होऊन ती 2,04,100 रुपयांवर बंद झाली होती. मात्र, जागतिक बाजारपेठेत चांदीची मागणी वाढल्याने आणि गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून याकडे पाहिले जात असल्याने चांदीने पुन्हा उभारी घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदी 3.44 टक्क्यांनी वधारुन 69.45 डॉलर प्रति औंस या सर्वोच्च स्तरावर पोहोचली.

Today Gold Price
Gold Silver Price: धनतेरसपूर्वी सोन्याचा नवा रेकॉर्ड! भाव 1 लाख 27 हजारांच्या पार; चांदीनंही दाखवली पुन्हा चमक

दरवाढीची प्रमुख कारणे काय?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) सौमिल गांधी यांच्या मते, सोन्या-चांदीतील ही तेजी सध्या थांबण्याची चिन्हे नाहीत. जागतिक स्तरावर 'स्पॉट गोल्ड' 1.86 टक्क्यांनी वधारुन 4420.35 डॉलर प्रति औंसवर पोहोचले.

या दरवाढीमागे प्रामुख्याने तीन मोठी कारणे आहेत. 1. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी करण्याचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळवला आहे. 2. अमेरिकन अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि वाढत्या वित्तीय चिंतांमुळे गुंतवणूकदार 'सुरक्षित मालमत्ता' म्हणून सोन्या-चांदीला पसंती देत आहेत. 3. जागतिक मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणावर होणारी खरेदी आणि औद्योगिक क्षेत्रात चांदीची वाढती गरज यामुळे किमतीत सातत्याने वाढ होत आहे.

Today Gold Price
Gold Silver Price: सोनं-चांदी झालं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर

तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत जागतिक राजकीय आणि आर्थिक स्थिती स्थिर होत नाही, तोपर्यंत मौल्यवान धातूंच्या किमतीत चढ-उतार सुरुच राहतील. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असला तरी, दागिन्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांना आपली खिसा आणखी रिकामा करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com