Murgaon Taluka Student 10th, 12th Dainik Gomantak
गोवा

Marathi Language : मराठी भाषा संस्कृती शिकवणारी ! प्राचार्य अनिल सामंत

दहावी व बारावी परीक्षेत मराठी विषयात 90 व त्याहून अधिक गुण संपादन करणाऱ्या मुरगाव तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या मराठी शिक्षकांचा गोवा मराठी अकादमी संचालित मुरगाव तालुका प्रभागातर्फे गौरव करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को : मराठी साहित्य जोपर्यंत तुमच्या हाती असेल, तोपर्यंत तुमचे आयुष्य अर्थपुर्ण असेल. जे मूल्यवान आहे ते मराठीतून मिळेल. मराठी ही संस्कृती शिकविणारी भाषा असून ती जीवन अर्थपूर्ण करणारी आहे, असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी केले.

दहावी व बारावी परीक्षेत मराठी विषयात ९० व त्याहून अधिक गुण संपादन करणाऱ्या मुरगाव तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या मराठी शिक्षकांचा  गोवा मराठी अकादमी संचालित मुरगाव तालुका प्रभागातर्फे गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रा. सामंत बोलत होते.

यावेळी अकादमीचे कार्यकारिणीचे सदस्य दिलीप शेर्लेकर, चंद्रकांत गवस, मुरगाव तालुका प्रभाग अध्यक्ष दयानंद राणे, सचिव नारायण महाले उपस्थित होते. नारायण महाले यांनी स्वागत व प्रास्तविक केले.

दहावी व बारावी परीक्षेत मराठी विषयात मुरगाव तालुक्यातून सर्वाधिक गुण प्राप्त करणारे रिया गोपीनाथ कुबल (९७ गुण, वाडेनगर इंग्लिश स्कूल नवे वाडे  आणि तेजस्विनी शंकर कोळंबकर (९५ गुण, दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालय सडा)

यांचा तसेच  सेट जोसेफ्स इन्स्टिट्यूटच्या मराठी शिक्षिका गीता खटावकर यांचा याप्रसंगी रमेश विश्राम राणे ट्रस्टतर्फे गौरव करण्यात आला. दयानंद राणे यांनी ट्रस्टच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ज्योती बांदोडकर यांनी सूत्रसंचालन केले.

दहावीच्या परीक्षेत ९० हून अधिक गुण संपादन करणारे विद्यार्थी

रिया गोपीनाथ कुबल, समीर महादेव गावडे (वाडेनंगर इंग्लिश स्कूल), रिया संदेश ढवळीकर, रिषा बिपीन कामुर्लेकर, सीया बिपीन कामुर्लेकर, सृष्टी तुळशीदास पालयेकर, आदित्य अभिजित शेट्ये, किर्ती बाळासाहेब पाटील, तेजश्री गौरिष नाईक (सर्व सेंट जोसेफ्स इन्स्टिट्यूट ).

निधी अनिल शिरोडकर, वेदा दामोदर उजगावकर, साईशा सगुण नाईक, युती प्रकाश मांद्रेकर (सर्व मुरगाव हायस्कूल सडा), मिताली राज यादव (माता सेकंडरी स्कूल, बायणा), कार्तिक विनोद पाटील, श्रृती भिकाजी पालव, आरती महेश कदम.

श्रावणी शैलेश नाईक, अनुष्का बसवराज निंनजावर (सर्व केशव स्मृती हायस्कूल, आल्त दाबोळी), संचिता सुनील शिरोडकर, सुहासिनी बाबनी आरोसकर (दीप विहार हायस्कूल सडा) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT