Murgaon Pollution: मुरगावला प्रदूषण मुक्त करा अन्यथा..; नागरिक संतापले

चेहऱ्यावर भुकटी फासत केला निषेध
Murgaon
MurgaonDainik Gomantak

वास्को: मुरगाव बंदरातून ट्रकांच्या माध्यमातून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यावर कोळसा तसेच कोळशाची भुकटी पडत असते. वारंवार आवाज उठवूनही या समस्येवर संबंधित काहीच कारवाई करीत नसल्याने आज सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी रस्त्यावर पडलेल्या कोळशाच्या भुकटीमध्ये लोळण घेत, चेहऱ्यावर भुकटी फासत निषेध केला. त्यांच्या या अभिनव निषेध पद्धतीबद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

(Murgaon Citizen protested to stop coal pollution)

Murgaon
Subhash Shirodkar: मये विकासासाठी फेरसर्वेक्षण गरजेचे
Murgaon
MurgaonDainik Gomantak

मुरगाव बंदरातून मोठ्या ट्रकद्वारे कोळशाची वाहतूक होते. हे ट्रक आता मुरगाव बंदर, सडा बायणा उड्डाण पूल, वरुणपुरी मार्गाने जातात. या ट्रकांमधून अनेकदा कोळसा व भुकटी रस्त्यावर पडते. रस्त्यावर पडलेल्या कोळशावरून वाहने गेल्यावर त्याची भुकटी होती. त्यामुळे प्रदूषण होत असल्याचे सांगत कोळसा प्रदूषण होऊ नये यासाठी पोळजी यांनी यापूर्वीही आवाज उठविला होता.

Murgaon
Goa News: मांद्रे, मोरजीत पार्किंग व्यवस्थेचे तीन तेरा

मुरगाव बंदरातून कोळसा घेऊन निघालेल्या ट्रकमधील कोळसा व भुकटी रस्त्यावर पडल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी आपला निषेध व्यक्त करताना, त्या कोळसाच्या भुकटीमध्ये लोळण घेतली. आपल्या चेहऱ्यावर भुकटी फासत संबंधित लोकप्रतिनिधी व इतरांनी प्रदूषण बंद होण्यासाठी पाऊले उचल्यासाठी आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com