Taxis in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: आमकां भिक नाका! ‘मोपा’संदर्भात टॅक्सीचालक आक्रमक, पेडणेत आंदोलन

टॅक्सीधारकांचे पेडणेत धरणे आंदोलन : सहनशीलतेचा अंत नको; सरकारला दिला इशारा

दैनिक गोमन्तक

Goa Taxi: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेडणेतील टॅक्सीधारकांना काउंटर देण्यात यावा, या मागणीसाठी ग्रीन फिल्ड मोपा टॅक्सी असोसिएशनच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता.14) सकाळी सुरू केलेले धरणे आंदोलन बुधवार(ता.15)पर्यंत स्थगित करण्यात आले.

15 रोजी सायंकाळी पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत काउंटरसंबंधित सविस्तर माहिती समजून घेतल्यावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

मंगळवारी सकाळी श्री भगवती देवीचे दर्शन व आशीर्वाद घेऊन आंदोलकांनी भास्कर नारुलकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. बाजारातून वळसा घेत कदंब बसस्थानकाकडून हा मोर्चा पेडणे सरकारी संकुलासमोर आला व त्याचे रूपांतर धरणे आंदोलनात झाले.

यावेळी आंदोलकांनी ‘आमच्यो मागण्यो मान्य करात, नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’सारख्या घोषणा दिल्या. त्यांच्या हातात ‘आमकां भिक नाका, हक्क जाय, हक्कासाठी आमचा लढा,’ असे फलक होते.

पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्ताराम राऊत व मोपा पोलिस ठाण्याचे निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सगळीकडे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अधिक पोलिस कुमकही आणण्यात आली होती.

सामंजस्याने विषय सोडवूया

पणजी येथे वाहतूक संचालक, सचिव, पर्यटन खाते सचिव, पेडणे वाहतूक कार्यालय अधिकारी व समितीचे सदस्य यांची संयुक्त बैठक झाली. त्यात टॅक्सी काउंटरसंबंधी बैठक होऊन मोपा विमानतळावर ब्ल्यू टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला. पेडणे वाहतूक कार्यालयात 150 अर्ज आले आहेत.

त्यांना प्राधान्य देण्याचे ठरले. सायंकाळी उशिरा उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन सरकारला आंदोलनकर्त्यांसंबधी सहानुभूती असून हा विषय सामंजस्याने सोडवूया, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: क्रीडा आणि संस्कृती मंत्र्याविना होणार पावसाळी अधिवेशन; गोवा मंत्रिमंडळात अधिवेशनानंतर फेरबदल

IND Vs ENG: जडेजाच्या 'त्या' निर्णयामुळे भारत हरला? अनिल कुंबळे म्हणतात...

इंग्लंडमध्ये '1947' च्या आठवणी ताज्या, राजीव शुक्लांनी किंग चार्ल्सना दिले 'स्कार्स ऑफ 1947' पुस्तक भेट!

Viral Video: दुधसागर धबधब्याचा नयनरम्य व्हिडिओ व्हायरल, निसर्गाची किमया पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Digital India Reel Contest: 'रील' बनवायला आवडतंय? दाखवा तुमचं टॅलेंट आणि जिंका 15,000 रुपये, केंद्र सरकारचा भन्नाट उपक्रम वाचा

SCROLL FOR NEXT