ST Reservation
ST ReservationDainik Gomantak

ST Reservation: एसटी बांधवांना राजकीय आरक्षण द्या; गोवेकरांचे थेट राष्ट्रपतींना निवेदन

शिष्टमंडळ दिल्लीत : अर्जुन मुंडा यांच्यासह इतरांचीही घेतली भेट
Published on

ST Reservation: गोव्यात एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी सध्या दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनच्या शिष्टमंडळाने काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपले निवेदन सादर केले. गोव्यात एसटी बांधवांना अजून त्यांचा हा घटनादत्त अधिकार देण्यात आलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सध्या या दौऱ्यावर या संघटनेचे निमंत्रक जॉन फर्नांडिस, रूपेश वेळीप, जोसेफ वाझ तसेच अन्य पदाधिकारी असून मागचे तीन दिवस ते दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी घेऊन आपली मागणी त्यांच्यासमोर मांडत आहेत.

काल त्यांनी गुजरात येथील एसटी खासदार प्रभू वसावा आणि राजस्थान येथील एसटी खासदार किरोडीलाल मीना यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली. ही चर्चा फलदायी स्वरूपाची होती, अशी माहिती वेळीप यांनी दिली.

ST Reservation
Goa Carnival 2023: कार्निव्हलमध्ये आता नवी प्रथा; आदल्या दिवशी ‘पडदा उघडणार'

काल त्यांनी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. यावर गंभीरपणे विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले.

त्यापूर्वी त्यांनी अनुसूचित जातीजमाती कल्याणासाठी नेमलेल्या संसदीय समितीचे अध्यक्ष डॉ. किरीट सोमजीभाई सोळंकी यांची भेट घेऊन त्यांनाही हे निवेदन दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com