Michael Lobo, Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Taxi aggregator: गोव्यात ‘टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर’वरून नवा वाद! लोबो, खंवटे आमनेसामने; वातावरण तापण्याची शक्यता

Taxi Aggregator Policy Goa: खंवटे म्हणाले की, ‘टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर’ हे व्यवसाय रेग्युलेट करण्यासाठी अत्यावश्यक आहे. हे तंत्रज्ञान लागू झाल्यावर पर्यटन व्यवसाय अधिक शिस्तबद्ध होईल.

Sameer Panditrao

Goa cab aggregator policy

पणजी: ‘टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर’ लागू करण्याच्या मुद्यावरून राज्यात पुन्हा राजकीय वादाला तोंड फुटले आहे. आमदार मायकल लोबो यांनी राज्यात सध्या ‘कॅब अ‍ॅग्रीगेटर’ नको असे मत व्यक्त केले आहे, तर पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आपण ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आपण यावर ठाम असून ‘टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर’सारखे नवे तंत्रज्ञान आवश्यक आहे. याबाबत कोणताही तडजोड होणार नाही, असे पर्यटन मंत्री खंवटे यांनी ठणकावून सांगितले आहे.

खंवटे म्हणाले की, ‘टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर’ हे व्यवसाय रेग्युलेट करण्यासाठी अत्यावश्यक आहे. हे तंत्रज्ञान लागू झाल्यावर पर्यटन व्यवसाय अधिक शिस्तबद्ध होईल. तसेच पर्यटन क्षेत्रात वाढलेले दलालांचे साम्राज्य संपुष्टात येण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

हे दलाल कोठून येतात आणि कसे येतात, हे मायकल लोबो यांनीही पाहावे, असा टोला देखील खंवटे यांनी यावेळी लगावला.

शॅक भाडे तत्वावर दिलेल्यांवर कारवाई सुरू असल्याचे मंत्री खंवटे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान शॅक भाड्याने दिले जात असल्यास परवाने रद्द होतील आणि त्यांना कायमचे काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशाराही मंत्र्यांनी पुन्हा एकदा दिला.

स्थानिक चालकांवर परिणाम नको

साळगावचे आमदार केदार नाईक यांनी स्थानिक टॅक्सी व्यवसायिकांच्या उपजीविकेचा मुद्दा मांडत, आपल्या मतदारसंघातील अनेक लोक टॅक्सी व्यवसायात असल्याचे नमूद केले. या टॅक्सी चालकांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ नये, यासाठी सरकारने आणि टॅक्सीचालकांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवावा, असे ते म्हणाले. टॅक्सी चालकांच्या समस्यांचे कायमस्वरूपी समाधान शोधणे आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT