Goa Taxi Mafia: 10 कि.मीचे 1600 रुपये? टॅक्सी माफियांची पोलखोल, Influencer ने सांगितला गोवा- थायलंडमधील फरक

Goa Tourism News: गोव्यात टॅक्सीच्या किमती महाग असल्याने लोकं गोव्याशिवाय थायलंड, व्‍हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशांमध्ये जाणं पसंत करतायत
taxi charges in Goa
taxi charges in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सध्या गोव्यात हॉटेलच्या वाढणाऱ्या किमती किंवा टॅक्सीचे वाढणारे दर चिंतेचा विषय बनतोय अशी माहिती काही लोकं सोशल मीडियावर पसरवत आहेत. अलीकडेच गोव्यात आलेल्या एका पर्यटकाने गोव्यातील टॅक्सी समस्येवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो गोव्यात टॅक्सीच्या किमती महाग असल्याने लोकं गोव्याशिवाय थायलंड, व्‍हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशांमध्ये जाणं पसंत करतायत असं त्याचं म्हणणं आहे.

व्हिडिओमध्ये आहे तरी काय?

या व्हिडिओमध्ये एक हिंदी भाषिक इन्फ्लूएंसार गोव्यातील टॅक्सी माफियांवर थेट निशाणा साधतोय. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, गोव्यात पर्यटकांची संख्या कमी होण्याला केवळ टॅक्सीचे दर कारणीभूत आहेत. गोव्यात ओला किंवा उबर सारखे कोणतेही टॅक्सी ऍप नाहीये, याउलट प्रत्येक हॉटेलच्या टॅक्सी गाड्या आहेत आणि टॅक्सी युनियन या गाड्या चालवतात. परिणामी एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नेमका किती खर्च येईल याचा अंदाज पर्यटकांना नसतो आणि हेच टॅक्सी माफिया पर्यटकाना लुटतात.

स्वतःचा अनुभव सांगताना हा पर्यटक सांगतो की त्याला १० किलोमीटर दूर एका शॅकमध्ये जेवायला जायचं होतं. मात्र एवढ्या अंतरासाठी त्याच्याजवळ १६०० रुपये मागण्यात आले.

taxi charges in Goa
Goa Tourism: पर्यटकांना गोवा सरकारची भेट! मनमानी भाडे आकारणाऱ्या टॅक्सीचालकांचं मीटर 'डाऊन', समितीचा प्रस्ताव

एकावेळी जर का मी सोळाशे रुपये देत असें तर फक्त ५०० रुपयांच्या जेवणासाठी मी बत्तीशे रुपये खर्च करावे का? असा प्रश्न त्याने उपस्थित केलाय. यासोबतच त्याने गोवा माइल्स या सरकारी टॅक्सी चालकांसोबत होणाऱ्या अन्यायावर देखील मुद्दा मांडला आहे.

मात्र याशिवाय जर या का एखादा पर्यटक इंडोनेशिया सारख्या देशात जात असेल तर १० किलोमीटरच्या अंतरासाठी त्याला फक्त १५० ते २०० रुपये द्यावे लागतात. किंवा २५० रुपयांमध्ये गाडीमधून सुद्धा फिरत येतं.आजकाल लोकांना महिनाभर प्रवास करायचा असतो आणि अशावेळी एवढा खर्च करणं किमान सामान्य लोकांना परवडणारं नाही आणि म्हणूनच गोव्याला एका स्वस्त ट्रासनपोर्टेशनची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com