Tanvi Vast  Dainik Gomantak
गोवा

Tanvi Vast: गोमंतकीयांना गंडवणाऱ्या तन्वीनं कोट्यवधी रुपयांचं काय केलं? पोलिसही शॉक; तपास सुरु

Goa Fraud Case: नेट बँकिंगची सवय नसलेल्‍या महिला आणि वृद्ध व्‍यक्‍ती यांना गंडवून ठकसेन तन्‍वी वस्‍त हिने जी कोट्यवधींची माया जमवली तिचे तिने नेमके केले तरी काय, हा सवाल सामान्‍य लोकांबरोबरच पोलिसांनाही सतावत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: नेट बँकिंगची सवय नसलेल्‍या महिला आणि वृद्ध व्‍यक्‍ती यांना गंडवून ठकसेन तन्‍वी वस्‍त हिने जी कोट्यवधींची माया जमवली तिचे तिने नेमके केले तरी काय, हा सवाल सामान्‍य लोकांबरोबरच पोलिसांनाही सतावत आहे.

तन्‍वीच्‍या बँक खात्‍यात केवळ साडेआठ हजार रुपयेच सापडले. त्‍यामुळे हा गंडा घालून आलेल्‍या पैशांचे तन्‍वीने काय केले, असा सवाल लोक विचारीत आहेत. कुडचडेचे पाेलिस निरीक्षक तुकाराम चव्‍हाण यांना यासंदर्भात विचारले असता, आम्‍हीही त्‍याचाच शोध घेत आहोत, असे उत्तर त्‍यांनी दिले. तन्‍वीने हे पैसे कुठे खर्च केले की आणखी कुठे गुंतविले. याचा सध्‍या पोलिस शाेध घेत आहेत.

सेंट्रल बँकेच्या काकोडा शाखेत ज्येष्ठ नागरिकांची (Senior Citizens) दिशाभूल करून त्यांना फसविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तन्वी वस्त व बँक व्यवस्थापक आनंद जाधव यांच्या पोलिस कोठडीत वाढ केल्यानंतर कुडचडे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपनिरीक्षकांकडून पुढील तपास सुरू आहे. तन्‍वी आणि जाधव यांनी केपे न्‍यायालयात जामिनासाठी जाे अर्ज केला आहे त्‍यावर ५ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, पोलिसांकडून सेंट्रल बँक काकोडा शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या जबान्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनपर्यंत बँकेच्या उच्चपदस्थांची जबानी घेणे बाकी असून तिही लवकरच होणार आहे. २५ व २६ नोव्हेंबर रोजी तन्वी वस्त तसेच व्यवस्थापक आनंद जाधव यांच्याविरोधात पोलिस स्थानकात दोन तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर अनेक खातेधारकांनी पोलिस स्थानकात धाव घेऊन अजूनपर्यंत एकूण २४ तक्रारी आलेल्या आहेत. मात्र, पोलिस त्यांची रितसर नोंद का करून घेत नाहीत, असा सवाल लोक करू लागले आहेत.

पैसे कधी मिळणार?

1 या प्रकरणात फसविले गेलेल्यांचे पैसे परत कसे व कधी मिळणार, असा सवाल खातेधारकांकडून करण्यात येत असून या प्रश्नावर कुडचडेचे नागरिक गप्प बसणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत.

2 पोलिसांनी या प्रकरणात संशयितांना अटक केल्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली होती व फसवणूक प्रकरणातील सोने जप्त केल्याचे सांगितले होते.

3 कारवाई कुठपर्यंत पोहोचली आहे त्याची माहिती पोलिसांनी जनतेला द्यावी तसेच लोकांचे पैसे त्यांना परत कधीपर्यंत मिळू शकणार तेही संबंधित यंत्रणेने स्पष्ट करावे, अशी मागणी होताना ऐकायला मिळत आहे.

अखेर दीपश्रीची कोठडीतून सुटका

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित दीपश्री सावंत गावसला आज पणजी प्रथमश्रेणी न्यायालयाने सशर्त जामीन दिला. त्यामुळे तिच्याविरुद्ध दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांतून जामिनावर तिची सुटका झाली आहे. तिच्याविरुद्ध म्हार्दोळ, फोंडा, डिचोली व पणजी पोलिस स्थानकात तक्रारी दाखल होत्या.

पणजी पोलिसांनी संशयित दीपश्रीला फोंडा पोलिसांच्या तपासकामानंतर ताब्यात घेऊन अटक केली होती. सुरुवातीला न्यायालयाने तिला पोलिस कोठडी दिली होती. तिने जामिनासाठी अर्ज केला होता. अर्जावरील सुनावणीवेळी तिला दोन दिवस पोलिस कोठडी वाढवून दिली होती. ती आज संपल्याने सकाळी तिची रवानगी न्यायालयीन कोठडी झाली होती. आज संध्याकाळी तिच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सशर्त जामीन दिला. वैयक्तिक १० हजार रुपयांच्या जाचमुचलका व तत्सम एक रक्कमेचा हमीदर तसेच तपासकामात सहकार्य करण्याचे व अधिकारी बोलावतील तेव्हा उपस्थित राहण्याच्या अटी घातल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिकांत संताप

मंगळवारी ओल्ड गोवेतील फेस्त साजरे करण्यात आले. सेनी कुलासो ऊर्फ तन्वी वस्त हिने फसविलेल्यांमध्ये बहुतेक ख्रिस्ती ज्येष्ठ नागरिक असून फेस्ताच्या आधी खरेदी करण्याच्या दृष्टीने बँकेत ठेवलेले पैसे काढण्यासाठी गेलेल्यांपैकी कित्येकांना आपणास फसविले गेल्याचा जोरदार धक्का सहन करावा लागलेला आहे. हा धक्का परिचित व्यक्तीने दिल्याने त्यांच्यात तीव्र संताप निर्माण झालेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT