चोरी आणि फसवणूक प्रकरणी बँक व्यवस्थापक आनंद जाधवला कोर्टाचा दणका; जामीन अर्ज फेटाळला!
Court Dainik Gomantak

Goa Fraud Case: चोरी आणि फसवणूक प्रकरणी बँक व्यवस्थापक आनंद जाधवला कोर्टाचा दणका; जामीन अर्ज फेटाळला!

Goa Fruad Case: चोरी आणि फसवणूक प्रकरणी बँक व्यवस्थापक आनंद जाधव यांना न्यायालयाने मोठा दणका दिला. जाधव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
Published on

कुडतरी: चोरी आणि फसवणूक प्रकरणी बँक व्यवस्थापक आनंद जाधव यांना न्यायालयाने मोठा दणका दिला. जाधव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. जाधव आणि तन्वी वस्त यांच्या विरोधात कुडतरी पोलिस ठाण्यात दोन अतिरिक्त तक्रारी दाखल करण्यात आल्या असून आतापर्यंत या दोघांविरोधात 19 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

आपल्या गोड वाणीने गोमंतकीयांना भुरळ पाडून तन्वी वस्तने कोट्यवधींचा गंडा घातला. या कामात तिला सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया बॅंकेच्या काकोडा शाखेचे व्यवस्थापक आनंद जाधव यांनी साथ दिली.

दरम्यान, व्यवस्थापक जाधव याने खातेदारांच्या खात्यावरुन परस्पर रक्कम उचलल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. तन्वी आणि जाधव यांनी आतापर्यंत 50 पेक्षा हून अधिक गोमंतकीयांना 1.30 कोटींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

चोरी आणि फसवणूक प्रकरणी बँक व्यवस्थापक आनंद जाधवला कोर्टाचा दणका; जामीन अर्ज फेटाळला!
Goa Fraud Case: तन्‍वीविरुद्ध 17 नव्या तक्रारी! 1.30 कोटींना गंडा; 83 वर्षीय ज्येष्ठ नागरिकालाही बनवलं बळीचा बकरा

दक्षिण गोव्‍याच्‍या (South Goa) पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी आज घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणात एका महिलेचे 25 लाखांचे सोन्‍याचे दागिने तन्‍वीने बदलले होते. तिने हे दागिने धनवर्षा गोल्‍ड लोन या संस्‍थेकडे गहाण ठेवून 25 लाखांचे कर्ज घेतले होते. त्‍यापैकी 18.45 लाखांचे दागिने कुडचडे पोलिसांनी या संस्‍थेकडून जप्‍त केले आहेत, अशी माहिती सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com