Vasco Goa 

 

Dainik Gomantak

गोवा

वास्को काँग्रेस गटाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी तन्वीर सौदागर

गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे वास्को काँग्रेस गटाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी तन्वीर सौदागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे वास्को काँग्रेस गटाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी तन्वीर सौदागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी पक्षाचे कार्य पुढे नेण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असल्याची माहिती नवनिर्वाचित वास्को काँग्रेस (Congress) गटाच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष तन्वीर सौदागर यांनी दिली.

गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांच्या वास्को येथील कार्यालयात तन्वीर सौदागर यांना वास्को काँग्रेस गटाच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी मुरगावचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, साजिद खान, वास्को काँग्रेस गटाचे युवा अध्यक्ष शंकर तांडेल उपस्थित होते. यावेळी नजीर खान यांनी सांगितले की, 'गोव्यातील सामान्य जनतेबरोबर अल्पसंख्यांक जनता यंदा पूर्णपणे काँग्रेस पक्षाबरोबर राहणार आहे. तसेच गोव्यातील अल्पसंख्यांकाना न्याय देण्यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस पुढाकार घेणार आहे.'

तन्वीर सौदागर यांनी सांगितले की, पक्षाचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वास्कोत काँग्रेसचे कार्य सर्वापर्यंत घेऊन जाणार असल्याची माहिती सौदागर यांनी दिली. यावेळी वास्को काँग्रेस युवा अध्यक्ष शंकर तांडेल यांनी पक्षाचे कार्य पुढे नेण्यासाठी काँग्रेस वरिष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असणार आहे. वास्कोत पुन्हा काँग्रेस मजबूत करण्यासाठी आपली शक्ती युवा नेते नंदादीप राऊत यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार असल्याची माहिती शेवटी तांडेल यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT