आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून निवृत्त होईन: पाऊस्कर

'सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीने नोकरीच्या घोटाळ्याचे आरोप सिद्ध केल्यास मी राजकारणातून निवृत्त होईन.', असे पाऊस्कर यांनी स्पष्ट केले आहे.
If the allegations are proved, I will retire from politics: Pauskar

If the allegations are proved, I will retire from politics: Pauskar

Dainik Gomantak 

Job Scam: ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसांपूर्वी मोठा नोकरभरती घोटाळा (Job Scam) उघडकीस आला. सर्वच विभागातील नोकरभरती प्रकियेमध्ये हा प्रकार घडला आहे. पण त्यातल्या त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) नोकरभरतीमध्ये तब्बल 70 कोटींचा घोटाळा झाला आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊस्कर (Minister Deepak Pauskar) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. पाऊस्कर यांनी शेकडो युवकांकडून पैसे घेतल्याची तक्रार बाबूश यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

<div class="paragraphs"><p>If the allegations are proved, I will retire from politics: Pauskar</p></div>
गोव्यात आणखी 4 जण ओमिक्रॉनबाधित

त्यासंदर्भातील पुरावे असल्याचा भांडाफोड सत्ताधारी पक्षाचे आमदार बाबूश मोन्सेरात (Babush Monserrat) यांनी केल्यानंतर मंत्री दीपक पाऊस्कर यांनी या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे सांगितले आहे. आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान त्यांनी केले आहे. मोन्सेरात यांनी शिफारस केलेल्या उमेदवारांची निवड न झाल्याने ते असे आरोप करत आहेत, असा पलटवार पाऊस्कर यांनी केला होता..

<div class="paragraphs"><p>If the allegations are proved, I will retire from politics: Pauskar</p></div>
कोर्डेलिया क्रुझवरील 66 प्रवासी कोरोनाबाधित...

पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, पीडब्ल्यूडी मंत्री दीपक पाऊस्कर यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या सर्व प्रकरणात त्यांची काहीच चूक नसून ते निर्दोष असल्याचा दावा करत आहेत. ते म्हणाले की, 'सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीने नोकरीच्या घोटाळ्याचे आरोप सिद्ध केल्यास मी राजकारणातून निवृत्त होईन.' ते अशा कोणत्याही सहभागी असून ; सावर्डे विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तिकीट मिळेल, असा विश्वासही त्यांना आहे. या सगळ्या प्रकरणात नेमके पुढे काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com