Goa Crime
Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

ताळगाव खंडणी प्रकरणाला लागले वेगळे वळण

दैनिक गोमन्तक

पणजी : ताळगाव येथील युवकाचे काल रात्री त्याच्या राहत्या फ्लॅटमधून अपहरण करून व त्यानंतर बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याच्याकडे 70 लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी करंझाळे येथून पाचजणांना अटक केली आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून त्यातील एक महिला विदेशी आहे. मात्र आता हा प्रकार कसिनो जुगाराच्या प्रकरणातून घडला असल्याचं स्पष्ट झालं आहे.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्यांची नावे संशयित अंतरिक्ष आशिश कुमार (33, बिहार), अंबर आशिश कुमार (34, बिहार), वरद मुनदादा (27, महाराष्ट्र), मोनिका प्रिया (31, बंगळुरू) व झिओडा करिमजोनोवा (32, उझबेकिस्तान) अशी आहेत, तर बेदम मारहाण करण्यात आलेल्या तक्रारदाराचे नाव दीपक कुमार (34) आहे. तक्रारदाराला संशयितांनी करंझाळे येथील त्यांच्या फ्लॅटवर नेऊन पैशांची मागणी करत लाथाबुक्क्यानी तसेच कमर पट्ट्याने मारहाण केल्याचे प्राथमित चौकशीत उघड झाले आहे.

तक्रारदार दीपक कुमार हा कसिनो जुगारात पोकर या खेळात तरजेब असल्याने त्याची ओळख अंतरिक्ष याच्याशी एका वर्षापूर्वी झाली होती. तो ऑनलाईन जुगार खेळायचा आणि यामध्ये पैसे गुंतवल्यास जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. सुरुवातीला अंतरिक्ष कुमार याने पैसे गुंतवले आणि हळुहळू इतर संशयितांनीही यात पैसे गुंतवले. काही महिने दीपक कुमार याने या संशयितांचे कसिनो ऑनलाईन जुगार यामध्ये पैसे गुंतवले आणि त्यांना जादा पैसे मिळवून दिले होते. संशयितांची अपेक्षा वाढवल्याने त्यांनी मोठ्या रकमा त्यामध्ये गुंतवल्या होत्या.

काही महिन्यानंतर दीपक कुमार याने त्यांनी गुंतववलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. त्याच्याशी वारंवार संपर्क साधूनही तो पैसे देत नसल्याने अखेर संशियतांनी त्याच्या ताळगाव येथील फ्लॅटवर जाऊन करंझाळे येथे आणले. त्याच्याकडे गुंतवणूक केलेल्या पैशांची मागणी या संशयितांनी केली. यावेळी त्याला सर्वांनी बेदम मारहाण केली आणि 70 लाख कोणत्याही परिस्थिती परत करण्यास सांगितले. हे पैसे भावाकडून मागवून दे असे सांगितले. त्याने भावाला फोन केला असता या घटनेचा एकूण प्रकार त्याच्या लक्षात आल्यावर भावाने या प्रकरणाची माहिती दिल्लीहून पणजी पोलिसांना दिली.

त्यानंतर पणजी पोलिसांनी दीपक कुमार याने जिथून मोबाईलवरून भावाला फोन केला होता त्याचे लोकेशन घेत करंझाळे येथील फ्लॅटमध्ये धडक दिली. त्यावेळी दीपक कुमार हा बेदम मारहाणीमुळे बेशुद्ध पडला होता तर संशयित मद्याच्या धुंदीत होते. त्यांना रात्रीच अटक करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT