सासष्टी : मडगाव येथील कोलवा जंक्शन तसेच जुना बाजार परिसरात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर लवकरच उपाय निघेल,असे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी वाहतूक पोलिस अधिकारी, नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांसमवेत रविवारी केलेल्या संयुक्त पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी सरदेसाईंसमवेत नगराध्यक्ष लिंडन परेरा, वाहतूक पोलिस उपअधीक्षक धर्मेश आंगले व स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.
आमदार सरदेसाई म्हणाले, की रवींद्र भवन कडून येणाऱ्या व न्यायालय इमारतीच्या मडगाव शहरात जाणाऱ्या कोपऱ्यातील पदपथ कमी केला जाईल. त्यामुळे वाहनांना फातोर्ड्याहून येताना थेट मडगाव शहरात जाणे सुरळीत होईल.
शिवाय स्मार्ट सिटी योजनेच्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत या सर्कलच्या चारही बाजूंनी सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे सरदेसाई यांनी सांगितले. रवींद्र भवन ते आर्लेम सर्कल दरम्यान रस्त्यावर बसेस पार्क करणे बंद करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पोलिस उपअधीक्षक (वाहतूक) धर्मेश आंगले म्हणाले, की मडगाव व फातोर्डा शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करून योजना आखली जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.