Candolim Murder Case | CEO Suchna Seth  Dainik Gomantak
गोवा

Suchna Seth: ... अन् सूचना ओक्साबोक्शी रडली

दैनिक गोमन्तक

Suchna Seth: सूचना सेठ या निर्दयी मातेने आपल्या चार वर्षांच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याची दुर्दैवी घटना जनमानसाच्या मनावर ठाशीवपणे उमटली आहे. शुक्रवारी कळंगुट पोलिसांनी सूचनाला त्या गेस्ट हाऊसमध्ये नेऊन त्यादिवशीच्या घटनेचा ‘क्राईम सीन रिक्रिएट’ करून घेतला. यावेळी सूचनाने पोलिसांना बऱ्यापैकी सहकार्य केले.

तीन दिवसांनंतर सूचना पहिल्यांदाच पोलिस चौकशीत सहकार्य करताना दिसली. तिने स्वत:हून पोलिसांना घटनाक्रम सांगितला. या काळात ती अनेकदा ओक्साबोक्शी रडली, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

रिक्रिएशनवेळी पोलिसांनी सूचनावर कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा प्रश्नांची सरबत्ती केली नाही. तिला बोलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य व मोकळीक दिली, जेणेकरून तिच्या बोलण्याची लय तुटू नये, याची खबरदारी पोलिसांनी घेतली. त्यामुळेच रिक्रएशनवेळी तिने महत्त्वाच्या घटनाक्रमाचे ऐच्छिक प्रकटीकरण (वॉलंटरी डिस्क्लोजर) केले.

रिक्रिएशनस्थळी पोलिस निरीक्षक परेश नाईक, महिला पोलिस उपनिरीक्षक प्रगती मळीक व इतर कर्मचारी उपस्थित होते. शुक्रवारी (ता.१२) सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात सूचनाला सिकेरीमधील त्या गेस्ट हाऊसवर आणण्यात आले.

जवळपास दीड तास (६.३० वाजेपर्यंत) या क्राईम सीनचे रिक्रएशन चालले. रिक्रएशनच्या काळात सूचनाने चिन्मयचा मृतदेह कशाप्रकारे सूटकेसमध्ये भरला आणि त्यानंतर स्वत:च चाकूने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हे तिने पोलिसांना सांगितले.

मुलाचा मृतदेह पाहून हादरलेच : सूचना

मुलाचा मृतदेह पाहून मी हादरले होते. त्यामुळेच मी डाव्या हाताची नस कापली आणि त्यानंतर वाहणारे रक्त थांबविण्यासाठी टिश्यू-पेपर तसेच टॉवेलचा वापर केला. तसेच रुममधील प्रथमोपचार पेटीमधून स्वतःच मलमपट्टी केली, याचा उलगडा तिने रिक्रीएशनवेळी केला. मात्र, मी मुलाची हत्या केली नाही, असा अजब दावा ती करत होती.

पुरावे सूचनाच्या विरोधात : सूचना शनिवारी (ता.६) विमानाने मोपा विमानतळावरून गोव्यात दाखल झाली. रात्री ११.३०च्या सुमारास सिकेरीमधील गेस्ट हाऊसमध्ये मुलासोबत उतरली. गेस्ट हाऊसमध्ये चेक-इन केल्यापासून ती एकटीच मुलासोबत होती. शिवाय चिन्मयचा मृतदेह असलेल्या कपड्यांच्या बॅगेसोबत ती पोलिसांना रंगेहाथ सापडली होती. त्यामुळे सर्व पुरावे तिच्या विरोधात आहेत. दुसरीकडे पोलिसांना रक्ताळलेल्या बॅगेमध्ये चिठ्ठी सापडली असून त्यातूनही अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

व्हिसेरा ‘फॉरेन्सिक’मध्ये, ३ महिन्यांनी अहवाल

  • सूचनाचा पती व्यंकटरमणला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स जारी केले होते.

  • त्यानुसार, शनिवारी (ता.१३) व्यंकटरमण गोव्यात दाखल होणार आहे.

  • तो सकाळच्या सत्रात कळंगुट पोलिस स्थानकात येईल.

  • उद्या (शनिवारी) सूचनाला पुन्हा गोमेकॉत नियमित तपासणीसाठी नेले जाईल.

  • सूचना यापूर्वी अनेकदा गोव्यात पर्यटन व कामानिमित्त मुलासोबत आली होती.

  • सूचनाला यावेळी पोळे येथे जायचे होते.

  • मात्र, तेथील हॉटेलचे बुकिंग तिला मिळाले नाही.

  • म्हणून तिने सिकेरीमध्ये गेस्ट हाऊसची रुम बूक केली.

  • सूचनाला सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

  • १४ जानेवारीपर्यंत सूचनाचा मुक्काम कळंगुट पोलिस कोठडीत आहे.

  • शुक्रवारी सूचनाने ‘मला सँडविच खायचे आहे’ असे पोलिसांना सांगितले.

  • त्यानुसार पोलिसांनी तिची इच्छा पूर्ण केली.

  • पोलिसांनी चिन्मयचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.

  • कळंगुट पोलिसांनी तो वेर्णा येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला आहे.

  • तीन महिन्यांनंतर या व्हिसेराचा अहवाल येणे अपेक्षित आहे.

  • या अहवालानंतरच चिन्मयला गुंगी येण्यासाठी कफ सिरप पाजले होते की नाही, याचा उलगडा होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT