Dhaloustav In Goa: गोव्यातील महिलांच्या कलागुणांसाठी हक्काचे व्यासपीठ: धालोत्सव

Dhaloustav In Goa: धालो हा गोव्यातील लोकसंस्कृतीचे लोककलेचे आणि लोकसाहित्याचे जतन व संवर्धन करणारा उत्सव म्हणजे धालोत्सव.
Dhaloustav In Goa
Dhaloustav In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Dhaloustav In Goa: धालो हा गोव्यातील लोकसंस्कृतीचे लोककलेचे आणि लोकसाहित्याचे जतन व संवर्धन करणारा उत्सव म्हणजे धालोत्सव. धालो’ हा गोव्याचा पारंपरिक उत्सव आहे. हा केवळ महिलांचा उत्सव आहे. यात पुरुषांना प्रवेश नसतो. पण उच्चवर्णीय महिला यात भाग घेत नाहीत.

Dhaloustav In Goa
kingfish Curry Recipe: अशी बनवा अस्सल गोवन पद्धतीची किंग फिश करी

पौष महिना सुरू झाला की गोमंतकीय महिलांना धालोत्सवाचे वेध लागायला सुरुवात होते. पौष महिन्यात पौर्णिमेला या धालो उत्सवाला प्रारंभ होतो.

धालोमांड - धालो मांडावर धालो खेळण्याची ही प्रथा जुनीच आहे. गावातील प्रांगण, मंदिराच्या प्रांगणात तसेच शेणाने सारवलेल्या अंगणात महिला धालो खेळतात यालाच धालोमांड म्हणतात.

तुळशीची पूजा - धालोच्या दिवशी म्हणजे पहिल्या रात्री धालोमांड महिला शेणानी सारवून घेतात. व तेथील तुळशीवृंदावनाची रंगरंगोटी करून घेतात. तुळशी या वनदेवतेसमोर मांडाची मानकरी महिला (गावकान) समई लावते. केळीच्या पानावर तांदुळ नारळ ठेवतात. खण, नारळ, काजळ, कुंकु, केळी, खोबरे ठेवून गावपुरुषाची प्रार्थना केली जाते.

धालोमांडावरील महिलांना कुंकु लावले जाते. त्यानंतर गावातील लोकांचे रक्षण कर व गावाचे भले होऊ दे असे सामुहिक गाऱ्हाणे देवाजवळ केले जाते. गाऱ्हाणे झाल्यानंतर नारळ फोडून त्यातील खोबऱ्याच्या तुकड्याचा प्रसाद सर्वांना वाटला जातो.

रंभा येणे: हा धालोतील महत्त्वाचा भाग आहे. या रंभा मासिक पाळी न आलेल्या कुमारिकांच्या अंगात येतात. या कुमारिकांच्या अंगात नाचता-नाचता त्यांच्या अंगात देव संचारलेला आहे असे मानले जाते. या रंभाना कुणी गाऱ्हाणी, समस्या सांगितल्या जातात. रंभा अडी अडचणी दूर करण्यासाठी उपायही सुचवतात. हा प्रकार देवळात अवसर किंवा भार आल्यासारखाच असतो.

Dhaloustav In Goa
Kokum Farming: जाणून घ्या, गोवन पदार्थात विशेष महत्व असलेले कोकम कसे पिकते

धालोच्या शेवटच्या रात्री नाचणाऱ्या बायकांच्या पावलांना विराम मिळतो. त्या रात्री विशेष कार्यक्रम होतो. शेवटची रात्र संपूर्ण जागवायची असते. त्यासाठी धालोत भाग घेणाऱ्या प्रत्येकाने तांदूळ, नारळ, चार आणे घेऊन मांडावर यावे लागते. या सर्वांतून खिचडी(आटवल) तयार केली जाते.

ही खिचडी (आटवल) फार रुचकर असते. या आटवलाचा काही भाग देवदेवतांना नैवेद्य म्हणून तर राहिलेला भाग जमलेल्या स्त्रियांना प्रसाद म्हणून दिला जातो. असतो. शेवटी धरतीमातेला नाचून खुप त्रास दिला म्हणून तिची क्षमा मागून तिची प्रार्थना केली जाते. त्यानंतर मांडावर शेण सारवले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com