Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: जामिनावर सुटून बाहेर येताच सादिक बेळ्ळारीचा काढला काटा...

खुनाचा बदला घेण्‍यासाठी हे हत्‍याकांड झाल्याचा संशय आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: शुक्रवारी (ता.१) रुमडामळ येथे खून करण्यात आलेला सादिक बेळ्ळारी हा एका खून प्रकरणात तुरुंगात होता. दोन महिन्यांपूर्वी तो जामिनावर सुटला होता. याच खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक कयास आहे.

या खुनात दाेघांचा हात असल्‍याचा पोलिसांना संशय असून हे संशयित कर्नाटकात पळून गेल्‍याची शक्‍यता असल्‍याने पोलिसांचे एक पथक कर्नाटककडे रवाना झाले होते. २०२० साली याच भागातील युवक मुजाहीद खान याचा खून झाला होता. या प्रकरणात सादिकला अटक झाली होती. याच खुनाचा बदला घेण्‍यासाठी हे हत्‍याकांड झाल्याचा संशय आहे. हे मारेकरी मुजाहीदचे जवळचे नातेवाईक असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

गेल्या चार दिवसांत तीन खुनांची प्रकरणे नोंद झाली असताना शुक्रवारी सकाळी रुमडामळ हाऊसिंग बोर्ड परिसरातील चौथ्या घटनेने भर घातली.

सादिकची आई व वडील सकाळी ८.३० वाजता कामानिमित्त घराबाहेर पडले होते. त्यानंतर ९.१५ वाजण्याच्या सुमारास घरात कुणीही नसल्याची संधी साधत झोपलेल्या सादिकवर संशयितांनी धारदार शस्त्रांनी वार केले. त्याच्या मानेवर व शरीरावर वार केल्याच्या खुणा आहेत.

सादिकला दिली होती धमकी

न्यायालयातील एका सुनावणीला जात असताना दोघांकडून मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार सादिक याने फातोर्डा पोलिसांत केली होती. त्यामुळे मुजाहीद याच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच सादिकचा खून करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT