Yuri Alemao: गोवा 'मर्डर डेस्टिनेशन' बनलाय, भाजपचे कुशासन कारणीभूत; युरी आलेमाव यांची घणाघाती टीका

आता राज्यपालांनीच सरकारमध्ये लक्ष घालण्याची मागणी
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

Yuri Alemao: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या कुशासनामुळे गोवा हे आता “मर्डर डेस्टिनेशन” झाले आहे. गोव्यात दररोज खुनाच्या घटना घडत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आता कोणतीही आशा नसल्याने मी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती करतो. राज्यपालानी नागरिकांना सुरक्षा पुरवीण्यासाठी तत्परता दाखवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

Yuri Alemao
Goa Murder: घनदाट जंगलात आढळला 'त्या' तरूणीचा मृतदेह

गेल्या दोन दिवसांत गोव्यात झालेल्या पाच खुनाच्या घटनांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केला की, गोव्यातील लोकांना सुरक्षा देण्यात भाजप सरकार संपुर्ण अपयशी ठरले आहे.

गोव्यात गुन्हेगारी करणार्‍यांच्या मनात आता अजिबात भीती राहिलेली नाही. खून, विनयभंग, ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले अशा घटना वारंवार घडत आहेत. दुर्दैवाने पोलीस खाते अद्यापही बेफिकीर आहे. राज्यात गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.

पोलिस विभाग कमी कर्मचारी आणि साधनसामग्रीच्या अभावाने सुसज्ज नाही. पोलीस भरती प्रक्रियेत थेट राजकीय हस्तक्षेप होत असून त्यामुळे भ्रष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पोलीस खात्यात भरती होत आहेत.

Yuri Alemao
Goa Indore Flight News: गोवा-इंदूर फ्लाईटचे थेट दिल्लीत लँडिंग; एअरलाईन्सच्या चुकीचा प्रवाशांना फटका

गोव्यात पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहभाग असलेले ७२ गुन्हे दाखल आहेत. हे चिंताजनक आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

सरकारने इव्हेंट करण्याच्या ध्यासातून बाहेर पडून गोव्यातील लोकांना सुरक्षितता आणि सुरक्षा प्रदान करण्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीकडे सरकारने दुर्लक्ष करणे चालूच ठेवल्यास या सरकारविरोधात बंड करण्यास गोमंतकीय मागेपूढे पाहणार नाहीत असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com