Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पारोडा खून प्रकरणी संशयिताला 48 तासांमध्ये अटक

पोलिसांकडून तपासासाठी सॅटेलाईटचा वापर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime: पारोडा-केपे येथे एका बिहारी कामगाराचा खून करून नंतर उत्तर प्रदेशमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करणारा संशयित प्रदीप यादव याला केपे पोलिसांनी पाठलाग करून अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगाराचे नाव अर्जुन शर्मा (25, बिहार) असे असून सोमवार, 13 मार्च रोजी त्याचा मृतदेह पारोडा येथे आडवाटेवर सापडला होता.

त्याच्या डोक्यावर फावड्याने वार केल्याने त्याचे निधन झाले होते. हे सर्व कामगार रस्त्याचे काम करत होते.

मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने खून-

अर्जुन शर्मा याचा मोबाईल फोन चोरण्याच्या उद्देशानेच प्रदीप यादवकडून हा खून करण्यात आल्याची माहिती धानिया यांनी दिली.

धानिया यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी उपनिरीक्षक शिवराम गावस, महिला उपनिरीक्षक वेरोनिका कुतिन्हो व इतरांच्या साहाय्याने या प्रकरणाचा यशस्वी तपास लावला.

म्हणून संशय बळावला...

या कामगारांमधील संशयित प्रदीप यादव हा अकस्मात गायब झाल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. सॅटेलाईटद्वारे संशयिताच्या हालचालींचा माग घेतला असता तो उत्तर प्रदेशच्या दिशेने ट्रेनमधून जात असल्याचे पोलिसांना कळून आले.

ही माहिती मिळाल्यावर उपनिरीक्षक शिवराम गावस यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तातडीने उत्तर प्रदेशला पाठविण्यात आले. पोलिस त्याचा माग काढत काढत उत्तर प्रदेशमधील खुशीनगर येथे पोहोचले, जो संशयिताचा गाव होता. या गावांतील कासिया येथील बस स्टॉपवर त्याला पकडण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT