Goa SSC Board Exam: 1 एप्रिलपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात; यंदा 'इतक्या' विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

1 एप्रिलपासून होणार्‍या दहावीच्या द्वितीय सत्र परीक्षेसाठी 20,493 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
Class 10 Board Exams
Class 10 Board ExamsDainik Gomantak

Goa SSC Board Exam: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची दुसरी सत्र परीक्षा बुधवारपासून सुरू झाली असून, 1 एप्रिलपासून होणार्‍या दहावीच्या द्वितीय सत्र परीक्षेसाठी 20,493 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 10,413 मुले आणि 10,080 मुली आहेत. तसेच, आणखी 423 जण रिपीटर विद्यार्थी आणि 72 खाजगी उमेदवारांनी देखील परीक्षेला बसण्यासाठी नोंदणी केली आहे. तसेच 23 विद्यार्थी आयटीआय नोंदणी म्हणून दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत.

Class 10 Board Exams
Fishing Boats Fire: मच्छीमारी बोटींना आग; संशयित आरोपी अटकेत

गोवा बोर्डाने महामारीच्या काळात विशेष बाब म्हणून दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम दोन समान भागांमध्ये विभागला होता. 2022-23 या चालू शैक्षणिक वर्षातही हा नमुना लागू आहे. या विशेष मूल्यमापन योजनेत, बोर्ड स्वतः प्रथम आणि द्वितीय-टर्म अशा दोन्ही परीक्षा घेते.

गेल्या आठवड्यात, गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एका नवीन परिपत्रकात म्हटले आहे की दहावी आणि बारावीच्या पहिल्या टर्म परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना एकवेळ सवलत म्हणून दुसऱ्या टर्मची परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार आहे.

जून/जुलै 2023 साठी SSC/HSSC च्या पुरवणी परीक्षेचा अभ्यासक्रम हा संपूर्ण अभ्यासक्रम असेल असे देखील ठरविण्यात आले आहे. पुरवणी परीक्षेत प्रथम किंवा द्वितीय परीक्षेतील कोणतेही गुण पुढे वाढवले जाणार नाहीत.

मार्च-एप्रिल 2023 च्या SSC आणि HSSC परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेत संपूर्ण अभ्यासक्रमाला बसण्याचा हा नियम लागू होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com