Sunburn Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Sunburn Death Case: ओव्हरडोस जीवावर बेतला? सनबर्नमध्ये मृत्यू झालेल्या दिल्लीच्या तरूणाचा Postmortem Report समोर

Delhi Youth Death at Sunburn: प्रकृती खालावल्याने मध्यरात्री त्याला म्हापसा येथील व्हिजन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

Akshata Chhatre

Sunburn Goa

बांबोळी:जागेवरुन वादात सापलेल्या सनबर्न ईडीएम महोत्सवाला पहिल्याच दिवशी गालबोट लागले. दिल्लीतून गोव्यात या महोत्सवासाठी आलेल्या २६ वर्षीय तरूणाचा म्हापसा येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी केलेल्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओव्हरडोसमुळे किडनीला इजा झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

म्हापसा येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठविण्यात आला. अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, तरुणाचा मृत्यू ओव्हरडोसमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओव्हरडोसमुळे किडनीला इजा झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पण, हा ओव्हरडोस कशाचा होता? याबाबत अहवालात खुलासा करण्यात आलेला नाही. अधिक माहितीसाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीत याची अधिक पडताळणी होणार आहे.

सनबर्न भोवती वादाचा भोवरा कायम

धारगळ येथे सुरू असलेला सनबर्न महोत्सव हा सातत्याने वादाच्या भोवऱ्यात असतो. २००७ पासून हा महोत्सव गोव्यात होत आहे. जगातील ११ व्या क्रमांकाचा सर्वात मोठा संगीत महोत्सव अशी त्याची ओळख असली तरीही या इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (EDM) महोत्सवाचा संबंध अंमली पदार्थांशीही जोडला जातो. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये तीन पर्यटकांचा मृत्यू झाल्याने सनबर्न महोत्सवाला गालबोट लागले होते.

आंध्र प्रदेशमधून आलेल्या दोन जणांचा रांगेत थांबले असताना मृत्यू झाला होता तर बेंगळुरूतील २६ वर्षांच्या तरुणाची महोत्सव सुरू असताना प्रकृती खालावली आणि तिने जीव गमावला होता. यंदाच्या वर्षी सनबर्न संगीत महोत्सवाला बराच विरोध झाला, अजूनही स्थानिकांकडून सनबर्नच्या विरोधात वाद सुरूच आहे. न्यायालयाकडून काही नियम आणि अटींसह सुरु असलेल्या या कार्यक्रमची पुढील सुनावणी ७ जानेवारी रोजी होईल.

दिल्लीतील तो तरुण कोण?

करण कश्यप नावाचा हा तरुण दिल्लीतील रहिवासी होता आणि काही मित्रांसोबाबत तो सनबर्नसाठी गोव्यात आला होता. संगीत महोत्सवाच्यावेळी अचानक बेशुद्ध झाल्याने त्याला व्हिजन रुग्णालयात हलवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पोलिसच दारू ढोसून जीप चालवतो, मुख्‍यमंत्र्यांच्‍या वाहन ताफ्‍याकडे झेपावतो; सामान्यांचं काय?

Kala Academy: कला अकादमीची तज्ञांकडून होणार तपासणी; समितीचा अहवाल आल्यानंतरच बंदबाबतचा निर्णय

Goa Nightclub Fire: हडफडे नाईटक्लब प्रकरण; मृतांच्या वारसांना भरपाई देण्यावर भर; मृतांचे वय, रोजगार, नावासह अहवाल देण्याचे कोर्टाचे आदेश

FIFA World Cup 2026: सामना संपताच डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले...! स्पेनला रोखणारा 'हा' गोलकीपर रातोरात बनला जागतिक स्टार; 50 लाख फॉलोअर्स वाढले

वाढीव 'FAR'साठी नवी नियमावली; सरकारची न्यायालयात माहिती, सुधारित निकष लागू होईपर्यंत नव्या अर्जांवर प्रक्रिया नाही

SCROLL FOR NEXT