Goa Government Jobs: आठवी, दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी संधी! 12 हजार तरुणांना रोजगाराचे लक्ष्य; सरकार उभारणार 25 कौशल्य केंद्रे

Goa Government Plans: तरुणांनी मौजमजेसोबतच करिअर घडविण्याकडे लक्ष द्यावे. प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणे शक्य नसले तरी कोणीही बेरोजगार राहू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
Goa Government Plans
Goa Government JobsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: तरुणांनी मौजमजेसोबतच करिअर घडविण्याकडे लक्ष द्यावे. प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणे शक्य नसले तरी कोणीही बेरोजगार राहू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे २५ दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य केंद्रे उभारून १२ हजार तरुणांना प्रशिक्षण देऊन खासगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

लोकभवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित युवा कौशल महोत्सवात ते बोलत होते. यावेळी खासदार सदानंद शेट तानावडे, दीपाली नाईक, संचालक विनायक कांबळी, दीपक सोनावणे आदी उपस्थित होते. सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना एक वर्षाची अप्रेंटिसशिप किंवा खासगी नोकरीचा अनुभव बंधनकारक करण्यात आला आहे. आतापर्यंत २५ हजार तरुणांनी अप्रेंटिसशिप पूर्ण केली असून, नव्याने चार हजार तरुणांना योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. गोवा मानव संसाधन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातही लवकरच वाढ करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

Goa Government Plans
Goa Dairy Workers: थकीत 'डीए'सह मागण्या मान्य करा, गोवा डेअरी कर्मचाऱ्यांचे 'घोषणाबाजी आंदोलन'

आठवी, दहावी किंवा बारावी उत्तीर्ण होऊनही रोजगार अथवा कौशल्य नसलेल्या तरुणांनी आरोग्य, आदरातिथ्य, व्यवस्थापन आणि व्यापार क्षेत्रातील प्रशिक्षण घ्यावे. तीन महिन्यांचे प्रशिक्षण विनामूल्य असून, त्यानंतर प्रमाणपत्रासह रोजगाराची संधी मिळणार आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणासोबत कौशल्य प्रशिक्षणाची सुविधा देण्याचा सरकारचा विचार आहे. गृहिणींनीही या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

नियुक्ती प्रक्रिया सुरू!

या केंद्रांतून आतापर्यंत १,२८७ तरुणांनी प्रशिक्षण घेतले असून, ९५८ जणांना खासगी क्षेत्रात नोकरी मिळाली आहे. आणखी ३८१ उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. खासदार सदानंद शेट तानावडे यांनी ग्रामीण तरुणांना रोजगार मिळाल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असे सांगितले.

Goa Government Plans
Goa Human Trafficking: पीडित महिलांना दोष नको; मानवी तस्कर, दलाल आणि शोषणाच्या संपूर्ण साखळीवर कारवाई करा – एआरझेड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.