IND vs PAK: आज भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार महामुकाबला! दुपारी 3 वाजता सामना, मोबाईलवर मोफत LIVE कुठे पाहता येणार?

IND vs PAK Live Streaming: दक्षिण आशियातील फुटबॉल चाहत्यांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. SAFF Championship 2026 स्पर्धेला 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होत असून पहिल्याच सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत.
IND vs PAK Live Streaming
IND vs PAK Live StreamingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

दक्षिण आशियातील फुटबॉल चाहत्यांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. SAFF Championship 2026 स्पर्धेला 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होत असून पहिल्याच सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. बांगलादेशची राजधानी ढाका येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटला की चाहत्यांमध्ये वेगळीच उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळे या सामन्याकडे केवळ दोन्ही देशांतील फुटबॉल चाहत्यांचेच नव्हे, तर संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.

भारतासमोर विजेतेपद कायम राखण्याचे आव्हान

भारतीय फुटबॉल संघासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. भारताने मागील SAFF Championship स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात भारताने कुवेतला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत करत जेतेपदावर नाव कोरले होते. आता पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. यंदाच्या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार असून 5 ते 17 नोव्हेंबरदरम्यान विविध सामने खेळवले जातील. त्यामुळे भारतीय संघाला आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान असेल.

IND vs PAK Live Streaming
Goa Dairy Workers: थकीत 'डीए'सह मागण्या मान्य करा, गोवा डेअरी कर्मचाऱ्यांचे 'घोषणाबाजी आंदोलन'

भारत-पाकिस्तान सामना कधी आणि किती वाजता सुरू होणार?

SAFF Championship 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ग्रुप-बीचा सामना 5 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. ढाका येथे होणाऱ्या या लढतीसाठी दोन्ही संघांनी तयारी केली आहे. विशेष म्हणजे, या सामन्याचे थेट प्रक्षेपण VETO या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. चाहत्यांना VETO वर लॉगिन करून हा सामना मोफत पाहण्याची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेतील इतर सामन्यांचे थेट प्रक्षेपणही याच प्लॅटफॉर्मवर होणार आहे.

पाकिस्तानविरुद्ध भारताचा ऐतिहासिक रेकॉर्ड काय सांगतो?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फुटबॉल सामन्यांचा इतिहास पाहिला, तर भारतीय संघाची कामगिरी लक्षवेधी राहिली आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 25 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी भारताने 16 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानला केवळ दोन सामन्यांत विजय मिळवता आला आहे. उर्वरित सात सामने अनिर्णित राहिले आहेत.

दोन्ही संघांमध्ये अखेरची लढत 2023 मध्ये झालेल्या SAFF Championship स्पर्धेत झाली होती. बंगळुरू येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला 4-0 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले होते. या विजयाचा शिल्पकार कर्णधार सुनील छेत्री ठरला होता. त्याने शानदार हॅट्ट्रिक नोंदवली होती. आता पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताना भारतीय संघाची नजर विजयाची परंपरा कायम ठेवण्यावर असेल.

SAFF Championship 2026 साठी भारतीय संघ

यंदाच्या स्पर्धेसाठी भारतीय संघात गोलरक्षकांपासून आघाडीच्या फळीतील खेळाडूंपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारतीय संघात अर्श अनवर शेख, मोहनराज के., प्रियांश दुबे, अब्दुल रबीह, बिजॉय वर्गीस, चिंगलेनसाना सिंह कोनशाम, हिंगथनमाविया राल्ते, खैमिनथांग ल्हुंगडिम, मुहम्मद उवैस, नाथन रोड्रिग्स, रोनी खारबुडन, संदीप मंडी, अभिषेक सूर्यवंशी, एडिसन सिंह थोकचोम, ब्रिसन फर्नांडीस, एबिंडास येसुदासन, फारुख चौधरी, मॅकर्टन निकसन, मंगलेंथांग किपगेन, निखिल प्रभू, नौफल पीएन, रिकी जॉन शाबोंग, सुरेश सिंह वांगजम, इरफान यदवाड, लिस्टन कोलाको, मुहम्मद सुहैल, विष्णू पीव्ही आणि सुहैल अहमद भट यांचा समावेश आहे.

IND vs PAK Live Streaming
Goa Land Zoning: गोव्यातील सेर्नाभाटी, कोलव्यातील 12.74 लाख चौ. मीटर जमीन 'अविकासयोग्य'; सरकारची मंजुरी

पाकिस्तानच्या संघात कोणत्या खेळाडूंना संधी?

पाकिस्ताननेही या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. पाकिस्तानच्या संघात साकिब हनीफ, हसन अली, युसूफ बट, अब्दुल रहमान, अब्दुल्ला इकबाल, अली खान नियाझी, ईसा सुलेमान, हारिस जेब, हसीब अहमद खान, मामून मूसा खान, मोहिबुल्लाह अफ्रिदी, वकार एहतिशाम बलोच, जुनैद शाह, आदिल नबी, अली उजैर महमूद, हय्यान खट्टक, तुफैल खान शिनवारी, जुनैल आबिदीन इशाक, मुहम्मद जुनैद, अली अकबर खान, सय्यद अली रजा, अब्दुल समद अरशद, आलमगीर गाजी, कलीमुल्लाह, मॅककील अब्दुल्ला, नजीबुल्लाह, शायक दोस्त आणि उमर नवाज यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.