

फोंडा: थकीत एकरकमी महागाई भत्ता (डीए) त्वरित द्यावा, या मागणीसाठी गोवा डेअरीच्या कर्मचाऱ्यांनी डेअरी संकुलाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी केली. कामगार नेते ॲड. राजू मंगेशकर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यापुढे कर्मचारी कामावर येताना आणि सुटल्यानंतर घोषणाबाजी करून निषेध नोंदवणार आहेत.
गोवा डेअरी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांची ‘डीए’ची थकीत रक्कम अद्याप दिलेली नाही. गणेश चतुर्थीला ही रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला; मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही.
याशिवाय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगही लागू करण्यात आलेला नाही. थकीत डीए, सातवा वेतन आयोग आणि अन्य मागण्या व्यवस्थापनाने त्वरित मान्य कराव्यात. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना ही भेट द्यावी, अशी मागणी मंगेशकर यांनी केली.
दिवाळीपूर्वी तरी न्याय मिळावा : गोवा डेअरी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचा थकीत डीए देण्यासह सातवा वेतन आयोग लागू करावा. वारंवार आश्वासने देऊनही मागण्यांची पूर्तता होत नसल्याने कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. दिवाळीपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास घोषणाबाजी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.