Mumbai Goa Highway Traffic Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: दीडशे वाहतूक पोलिसांनी सावरलों 'सनबर्न'! योग्य नियोजनामुळे ट्रॅफिक व्यवस्था सुरळीत

Goa Sunburn Traffic:सनबर्न महोत्सवावेळी वाहतूक व पार्किंग व्यवस्थेचे योग्य नियोजन वाहतूक पोलिसांनी केल्याने महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीस कोणताही अडसर आला नाही.

Sameer Panditrao

Sunburn festival traffic parking arrangement

पेडणे: सुकेकुळण-धारगळ येथे भरलेल्या सनबर्न महोत्सवावेळी वाहतूक व पार्किंग व्यवस्थेचे योग्य नियोजन वाहतूक पोलिसांनी केल्याने महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीस कोणताही अडसर आला नाही. यासाठी वाहतूक पोलिस अधिक्षक प्रबोध शिरवइकर, सुदेश नार्वेकर व पेडणेचे वाहतूक पोलिस निरीक्षक विश्वजीत चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दीडशे वाहतूक पोलिसांनी तीन दिवस यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे येथील वाहतुकीस कोणतीही अडचण आली नाही.

यापूर्वी आयोजित केलेल्या सनबर्न महोत्सवास ६० ते ७० हजार लोकांनी उपस्थिती लावली होती. धारगळ प्रथमच भरवण्यात आलेल्या या महोत्सवाला नेमके किती लोक येणार याचा कोणताही अंदाज आयोजक तसेच पोलिसांना नव्हता. महोत्सवास येणाऱ्या लोकांची संख्या वाढल्यास येथील रस्ता वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता होती. विशेषत: महामार्गावरील वाहतूक तसेच मोपा विमानतळावर जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीस अडचण होण्याची शक्यता होती. तसेच सर्व्हीस रोडही प्रभावित होण्याची शक्यता होती.

महोत्सव स्थळी सुमारे ५००० हजार वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली होती. म्हापसा पणजीहून येणाऱ्या वाहनांसाठी पूर्वीची विकास नर्सरी अंडरपास पुलाजवळ व क्रिकेट मैदानावर तसेच सुके कुळण येथील उड्डाणपुलाच्या वाहनांची सोय केली होती.

महामार्गावरील तसेच विमानतळावर जाणाऱ्या वाहनांना अडथळे येऊन नयेत रेडकर इस्पितळाजवळील दुसऱ्या रस्त्यावर जाण्यासाठी असलेला मार्ग बंद करण्यात आला होता. तसेच उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या सर्विस रोड वरून चांदेल-हसापूर या दिशेने जाणारी वाहतूकही बंद ठेवण्यात

आली होती. तीन दिवस भरलेल्या या महोत्सव स्थळी रोज सुमारे १,७०० चारचाकी तर सुमारे ६,००० दुचाकी वाहने येत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: गोव्यात ‘ओंकार’ हत्तीचा मुक्काम वाढला! दसऱ्यानंतरच होणार सीमोल्लंघन; म्‍हैसूरमधील उत्सवानंतर येणार पथक

Majorda: तरुणाला शिंगावर घेऊन आपटले, शिंग घुसले छातीत! 'त्या' रेड्याला पाजले होते उत्तेजक द्रव्य! 6 जणांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा

Goa Politics: व्‍हेंझी, विरियातोंविरोधात पोलिस तक्रार, भाजप कार्यालयात घुसखोरी केल्‍याचा आरोप

Rama Kankonkar: '..तर गोमेकॉबाहेर खाट घालून उपचार करु'! काणकोणकरांच्या डिस्‍चार्जबाबत कार्यकर्ते अस्‍वस्‍थ; निर्णयावरुन संशय

Horoscope: नवरात्रीचा तिसरा दिवस, 'या' 4 राशींवर राहील देवीचा आशीर्वाद; कौटुंबिक मतभेद मिटतील आणि मानसिक समाधान लाभेल

SCROLL FOR NEXT