Sunburn Festival Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: 'गोव्याशी तुलना करू शकत नाही...' मुंबईतील पहिल्या सनबर्न फेस्टिव्हलबाबत 'EDM' चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

Mumbai Sunburn Festival: गेल्या सतरा वर्षापासून गोव्यात होणाऱ्या ईडीएम सनबर्न (Sunburn Festival) संगीत महोत्सव आता मुंबईत होत आहे.

Sameer Amunekar

गेल्या सतरा वर्षापासून गोव्यात होणाऱ्या ईडीएम सनबर्न (Sunburn Festival) संगीत महोत्सव आता मुंबईत होत आहे. १९ डिसेंबर रोजी शिवडी येथील 'इन्फिनिटी बे' येथे या आंतरराष्ट्रीय संगीत सोहळ्याचे भव्य उद्घाटन झाले. गेल्या दशकापासून गोव्याचे समीकरण बनलेल्या या महोत्सवाने मुंबईत पाऊल ठेवताच चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण केली आहे.

मुंबईच्या किनाऱ्यावर 'टेक्नो' संगीताची जादू

सनबर्न महोत्सवाच्या पहिल्या रात्री अमेरिकेची प्रसिद्ध डीजे सारा लँड्री (Sara Landry) हिने आपल्या 'टेक्नो' संगीताने मुंबईकरांना मंत्रमुग्ध केले. साराचा हा भारतातील पहिलाच कार्यक्रम असल्याने तिला ऐकण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळली होती.

मुंबईच्या समुद्राकाठी वसलेल्या या नवीन ठिकाणी रात्री उशिरापर्यंत संगीताचा जल्लोष सुरू होता. विशेष म्हणजे, पारंपारिक गोव्याच्या तुलनेत मुंबईतील या आवृत्तीने 'अर्बन ईडीएम' संस्कृतीची एक नवी झलक सादर केली आहे.

गोव्याची आठवण

सनबर्न गेल्या सतरा वर्षापासून गोव्यात होत होता, यंदा मुंबईत पहिल्यांदाच होत असल्याने चाहत्यांमध्ये गोव्याच्या आठवणी ताज्या झाल्या. २०२२ च्या गोवा सनबर्नला गेलेल्या एका दांपत्याने सांगितले की, "गोव्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही, पण मुंबईतील अनुभवही तितकाच सुखद आणि वेगळा आहे."

महालक्ष्मी येथून आलेल्या ४० वर्षीय स्वर्ण अग्रवाल यांनी आयोजनाचे कौतुक केले, मात्र एकाच वेळी अनेक स्टेजवरील आवाज एकमेकांत मिसळत असल्यामुळे 'साउंड जॅमर्स'ची गरज असल्याचे मत मांडले.

तरुणाईचा उत्साह मात्र वाखाणण्याजोगा होता. अंधेरीहून आलेल्या काही तरूणींनी सांगितले की, वाहतूक कोंडी असूनही सारा लँड्रीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी केलेला प्रवास सार्थ ठरला. पहिल्यांदाच महोत्सवाला आलेल्या मुदित शाह यांनी शिवडीच्या ठिकाणाचे कौतुक केले, कारण त्यांच्या मते हे ठिकाण रेसकोर्सपेक्षा प्रवासासाठी अधिक सोयीचे आहे.

डेव्हिड ग्वेता आणि ॲक्सवेलचा धमाका

हा महोत्सव २१ डिसेंबरपर्यंत (रविवार) सुरू राहणार आहे. येणाऱ्या दोन दिवसांत जागतिक कीर्तीचे कलाकार रंगत वाढवणार आहेत. दुसऱ्या दिवशी 'डेव्हिड ग्वेता' (David Guetta) आपल्या जगप्रसिद्ध गाण्यांनी मुंबईकरांना थिरकायला लावेल, तर शेवटच्या दिवशी 'ॲक्सवेल' (Axwell) याच्या परफॉर्मन्सने या सोहळ्याची सांगता होईल. त्यामुळे, रविवारपर्यंत मुंबईत संगीताचा हा ज्वर कायम राहणार असल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

SCROLL FOR NEXT