Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Cm Pramod Sawant: दोन्ही जिल्हा पंचायतींवर युतीची सत्ता आणेल. या विजयासह राज्यात तिहेरी इंजिन कार्यरत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
Cm Pramod Sawant
Cm Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप-मगोप युती विरोधकांना ‘क्लिन स्वीप’ करेल आणि दोन्ही जिल्हा पंचायतींवर युतीची सत्ता आणेल. या विजयासह राज्यात तिहेरी इंजिन कार्यरत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. ते म्हणाले, या निवडणुकीत भाजपचे ४०, मगोपचे ३ आणि पाठिंबा दिलेले अपक्ष सात उमेदवार आहेत. ३५ जागांवर आम्ही जिंकू आणि चार ते पाच जागांवर अटीतटीची लढत असेल. दोन्ही जिल्हा पंचायतीत भाजपचाच अध्यक्ष असेल. साडे आठ लाख मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे. विधानसभा जेवढी महत्त्वाची तेवढीच जिल्हा पंचायत महत्त्वाची आहे.

ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागाची उन्नतीसाठी सामूहिक शेती, दुग्धउत्पादन, फलोत्पादन आणि मच्छिमारी असे उपक्रम हाती घेतले आहेत. ग्रामीण विकास या खात्याबरोबर स्वयंसाह्य गट व जिल्हा पंचायत जोडून महिला सशक्तीकरणाची पावले उचलली जातील. महिलांची उन्नती कशी होईल, यावर आमचे लक्ष केंद्रीत असेल. कुशल-अकुशल कामगारांसाठी ग्रामीण भागात उपक्रम राबविले जातील.

माझे घर योजनेचे अर्ज लोक भरत आहेत, या योजनेला विरोध करणारे आता उघडे पडले आहेत. या सरकारच्या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २०२७ पूर्वी माझे घर योजनेतून घरे कायदेशीर करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आपण प्रत्येक बैठकीत आपण मतदारांनी आपले मत विकासासाठी द्यावे, असे आवाहन केले आहे. मतदारांना मोठ्या संख्येने बाहेर पडून १०० टक्के मतदान सुनिश्चित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Cm Pramod Sawant
Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! 300 हून अधिक पोलिस तैनात; मतदारसंघांमध्ये चुरस

भाजपच्या २९३ कोपरा बैठका

प्रचाराला लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे. प्रचारादरम्यान तब्बल २९३ कोपरा सभा घेण्यात आल्या. युतीने चांगले युवा उमेदवार दिले आहेत. आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीत ३५ पेक्षा जास्त जागा जिंकू. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात यापुढे तिहेरी इंजिन दिसेल, यात शंका नाही. दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष.

Cm Pramod Sawant
Goa ZP Election 2025: फोंडा तालुक्यातील कौल कोणाच्या बाजूने? भाजपची प्रतिष्ठा पणाला; विधानसभेची रंगीत तालीम

सरकारवर टीका; पण...

अपघात, दरोड्याच्या घटनांवरून विरोधकांकडून सरकारवर टीका झाली आहे, त्याचा परिणाम निवडणुकीत होईल काय, यावर उत्तर देताना सावंत म्हणाले, वास्कोतील दरोड्यातील धागेदोरे नसतानाही पोलिसांनी आरोपी पकडले. अपघातांच्या बाबतीत जी पावले उचलायची आहेत, ती सरकार पावले उचलत आहे. लोकांनी त्याविषयी काळजी घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com