peggy gou  Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: सनबर्नला पर्यटन खात्याची मान्यता मिळताच आयोजकांकडून आणखी कलाकारांची घोषणा; दक्षिण कोरियन आयकॉन 'पेगी' लावणार हजेरी

EDM festival Goa December 2024: धारगळ येथे सनबर्नचे २८ ते ३० डिसेंबरदरम्यान आयोजन कऱण्यास पर्यटन खात्याने तत्वतः मान्यता दिल्यावर आयोजकांनी आणखीन कलाकारांची घोषणा केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News: धारगळ येथे सनबर्नचे २८ ते ३० डिसेंबरदरम्यान आयोजन कऱण्यास पर्यटन खात्याने तत्वतः मान्यता दिल्यावर आयोजकांनी आणखीन कलाकारांची घोषणा केली आहे. ग्रॅमी पुरस्कार विजेता आणि ईडीएम क्षेत्रातील दिग्गज स्क्रिलेक्स आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध दक्षिण कोरियन आयकॉन पेगी गौ यांची सनबर्नमध्ये प्रमुख भूमिका असणार आहे.

आशियातील एशियातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल, सनबर्न गोवाने (Goa) या एका रोमांचक घोषणेने चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. याआधीच जाहीर करण्यात आलेल्या अलेसो, केएसएचएमआर आणि आर्गी यांसारख्या नामवंत कलाकारांबरोबर, या वर्षीचा सनबर्न गोवा संगीत क्षेत्रातील एक अद्वितीय अनुभव देण्याचे वचन देतो असे आयोजकांचे म्हणणे आहे. स्क्रिलेक्स हा इलेक्ट्रॉनिक म्युझिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा कलाकार आहे, ज्याने डबस्टेप संगीताला जागतिक स्तरावर पोहोचवले.

‘बँगारांग,’ ‘स्केरी मॉन्स्टर्स अँड नाइस स्प्राईट्स’ यांसारख्या गाण्यांपासून जस्टिन बीबर आणि डिप्लोसारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबतच्या कोलॅबोरेशनपर्यंत, स्क्रिलेक्सचे गाणे आणि त्याची लाईव्ह परफॉर्मन्सेस चाहत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्याच्या अनेक ग्रॅमी पुरस्कारांनी सजलेल्या कारकिर्दीमुळे, भारतातील (India) त्याचा परफॉर्मन्स संगीतप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. तिच्या परफॉर्मन्समुळे संगीतप्रेमींना इलेक्ट्रॉनिक संगीताच्या नव्या जगात नेणारा एक वेगळा अनुभव मिळणार आहे.

वेगळी ओळख!

अनोख्या हाऊस आणि टेक्नो संगीताने तिने जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘स्टारी नाईट,’ ‘आय गो’ आणि व्हायरल हिट ‘नाना (इट गोज लाईक)’ ही गाणी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT