Sunburn Festival: ‘सनबर्न’विरोधात तिसरी याचिका दाखल! सुनावणी 12 डिसेंबरपर्यंत तहकूब

Goa Sunburn 2024: धारगळ येथे सनबर्न ईडीएम महोत्सव आयोजित करण्यास विरोध करणाऱ्या दोन वेगवेगळ्या याचिकांवरील सुनावणी आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने येत्या गुरुवारी १२ डिसेंबरपर्यंत तहकूब केली.
Goa Sunburn 2024. Sunburn Festival Petitions
Goa Sunburn 2024google image
Published on
Updated on

3rd Petition Against Sunburn Festival 2024 Dhargalim

पणजी: धारगळ येथे सनबर्न ईडीएम महोत्सव आयोजित करण्यास विरोध करणाऱ्या दोन वेगवेगळ्या याचिकांवरील सुनावणी आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने येत्या गुरुवारी १२ डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

सनबर्नविरोधात आणखी एक याचिका धारगळवासीयांनी सादर केली आहे. त्यामुळे आता तीन याचिकांवर सुनावणी एकत्रित होणार आहे. धारगळ येथील भरत बागकर याने सनबर्न महोत्सव धारगळ गावात झाल्यास ड्रग्ज तसेच ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा जनहित याचिकेत उपस्थित केला होता.

Goa Sunburn 2024. Sunburn Festival Petitions
Goa Politics: 'विरोधकांचे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा'! मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ भाजपचा पलटवार

ही याचिका सादर केली होती तेव्हा पंचायत किंवा सरकारने सनबर्नला कोणताच परवाना दिलेला नव्हता. त्यामुळे खंडपीठाने ही याचिका ९ डिसेंबरपर्यंत तहकूब केली होती. ही जनहित याचिका खंडपीठात प्रलंबित असताना पंचायतीने ठराव घेऊन सनबर्नला धारगळ येथे आयोजनास तत्त्वतः परवाना देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बागकर यांनी नव्याने याचिका दाखल करून या निर्णयाला आव्हान दिले आहे.

Goa Sunburn 2024. Sunburn Festival Petitions
Sunburn Festival: 'विरोध‌‌ करणारे नंतर वेगवेगळ्या मागण्या करतात'; सनबर्नच्या संस्थापकांनी केले खळबळजनक आरोप

या दोन्ही याचिका आज खंडपीठासमोर सुनावणीस आल्या, तेव्हा आणखी एक तिसरी याचिका सादर करण्यात आली व त्यावरील सुनावणी एकत्रित घेण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने या तिन्ही याचिकांवरील सुनावणी आता १२ डिसेंबरला ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com