Suleman Khan case Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan: पोलिसांची मागणी न्यायालयाने केली अमान्य; सिद्दीकीला न्यायालयीन कोठडी कायम

Suleman Khan Controversy: आदेशाचा फेरविचार व्हावा, यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेने पणजी येथील प्रधान जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता

Akshata Chhatre

पणजी: पोलिस कोठडीतून पळून गेल्यामुळे चर्चेत आलेला भू-बळकाव प्रकरणातील संशयित सुलेमान सिद्दीकी याला जिल्हा सत्र न्यायालयानेही दिलासा दिला आहे. मडगावच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी सिद्दीकीला यापूर्वी न्यायालयीन कोठडी दिली होती. या आदेशाचा फेरविचार व्हावा, यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेने पणजी येथील प्रधान जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, जिल्हा न्यायालयाने पोलिसांचा अर्ज फेटाळून लावला आहे.

सुलेमान सिद्दीकी पोलिस कोठडीतून पळून गेल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. कोठडीतून पळून जाणे आणि मोठ्या प्रमाणात केलेले जमीन व्यवहार, यासंदर्भातील तपासासाठी पोलिस कोठडी हवी असल्याचे गुन्हे शाखेचे म्हणणे होते.

मात्र, न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे स्वीकारले नाही. संशयिताच्या वतीने ॲड. सलमान पठाण आणि ॲड. राकेश नाईक यांनी न्यायालयात बाजू मांडली.

सात पानांचा दस्तावेज काय सांगतो?

जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याला ६ मार्च रोजी पोलिस संरक्षणात न्यायालयीन कोठडी वाढवून घेण्यासाठी न्यायालयात आणले असता जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मोठमोठ्याने ओरडून सांगत त्याने गोंधळ घातला. तसेच त्याने लिखित सात पानांचा दस्तावेज माध्यम प्रतिनिधींकडे फेकला, ज्यात त्याने १९९९ पासून आतापर्यंत भू-बळकाव प्रकरणातील राजकारणी, पोलिस तसेच सरकारी अधिकाऱ्यांशी झालेले संवाद तसेच सेटलमेंटसाठी देण्यात आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांचा उल्‍लेख केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT