Amit Naik Mother Plea To Police Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan Escape: मुलाला एकदा तरी भेटू द्या! अमितच्या हतबल आईची पोलिसांना विनवणी; रडून रडून सुजले डोळे

Amit Naik Mother Plea To Goa Police: अमितला भेटण्यासाठी आम्हाला पोलिस परवानगी देत नाही. मला माझ्‍या मुलाला निदान दुरून का होईना, एकदा तरी पाहण्याची परवानगी पोलिसांनी द्यावी.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: अमितला भेटण्यासाठी आम्हाला पोलिस परवानगी देत नाही. मला माझ्‍या मुलाला निदान दुरून का होईना, एकदा तरी पाहण्याची परवानगी पोलिसांनी द्यावी, अशी विनवणी अमित नाईक याची आई प्रेमा नाईक हिने केली आहे. शांत स्वभावाचा व प्राणिमात्रांवर माया करणारा अमित असे काही करेल यावर माझा मुळीच विश्‍‍वास नाही, असेही रडत रडत तिने सांगितले. विशेष म्‍हणजे रडून रडून त्‍या माऊलीचे डोळे सुजले आहेत.

अमित व त्याच्या भावंडांचे शिक्षण (Education) वास्कोतच झाले आहे. पूर्वी आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत होतो. त्यानंतर काटे-बायणा भागात फ्लॅट विकत घेतला. माझा लहान मुलगा अमेरिकेत काम करू लागल्यावर त्याने जयरामनगर-दाबोळी येथे रो बंगला पाहिला व तो पसंत केला. त्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. ते आम्ही अद्याप फेडत आहोत, असे प्रेमा नाईक यांनी सांगितले.

काहीच माहीत नसताना लोक विविध वावड्या उठवीत आहेत. त्यामुळे आणखी मानसिक त्रास होतो. अमित पोलिसांना शरण आल्यापासून त्याचा व आमचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्याला भेटता यावे, पाहता यावे म्‍हणून माझा जीव तळमळत आहे. पोलिसांनी निदान एकदा तरी आम्हाला त्याला पाहण्याची परवानगी द्यावी.

- प्रेमा नाईक, अमितची आई

तीन वर्षांपूर्वी माझ्या लहान मुलाचे निधन झाले. त्‍यामुळे आम्‍हाला मोठा मानसिक धक्का बसला. त्यातून पूर्णपणे सावरलो नसतानाच आता हे संकट आले. २०१९ साली रो बंगला विकत घेतला असला तरी त्याचे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी आम्हाला चौघांना काम करावे लागते. मी स्वतः टेलरिंग करून काही पैसे कमावते. तर, माझा नवरा अशोक हे मिक्सर, पंखे, इस्त्री दुरुस्ती करण्याचे काम करतात. मुलगी अलीकडेच बंगलोर येथे कामाला गेली आहे. अमितची अर्धी कमाई प्राणिमात्रांवर खर्च होते. त्‍याला पोलिसांनी अटक केल्यापासून आमच्‍या बंगल्याबाबत लोक वावड्या उठवत आहेत, असे प्रेमा नाईक म्‍हणाल्‍या.

मानसिक धक्का; वडिलांवर उपचार सुरू

सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान प्रकरण ज्या दिवशी घडले, त्या दिवशी सकाळी दोन पोलिस आमच्या घरी हजर झाले. त्यांनी सर्व घराची तपासणी केली व ते निघून गेले. तेव्हा आम्हाला सदर प्रकरण समजले. त्‍यामुळे अमितच्या वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यांना त्‍याच दिवशी उपचारांसाठी इस्‍पितळात नेण्यात आले. आजही ते तपासणीसाठी गोमेकॉत गेले होते, असे प्रेमा नाईक म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT