Suleman Khan Escape: पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, काँग्रेस आमदारांची मागणी; काय आहे कारण

SP Rahul Gupta Suspension Demand: गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांना ताबडतोब निलंबित करावे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी केली.
'राहुल गुप्‍तांना ताबडतोब निलंबित करा,' आमदार फेरेरा आक्रमक; Suleman Khan Escape  प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर सवाल
Carlos FerreiraDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: जमीन हडप करणारा संशयित आरोपी सुलेमान खान ऊर्फ सिद्दीकी याला पळून जाण्‍यास मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांना ताबडतोब निलंबित करावे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी केली.

कार्लुस यांनी एक व्हिडिओ जारी करताना अनेक प्रश्न विचारले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये इतर कोणतेही कर्मचारी कसे दिसत नाहीत, असे विचारून मोजकेच सीसीटीव्ही फुटेज जाहीर केल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. गुन्हे शाखेतील उच्च अधिकाऱ्यांच्‍या सक्रिय संगनमताशिवाय आणि सहभागाशिवाय तो पळून जाऊ शकतो का? व्हिडिओमध्ये आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक लॉकअप उघडून आरोपीला सेलमधून बाहेर काढताना दिसतो.

'राहुल गुप्‍तांना ताबडतोब निलंबित करा,' आमदार फेरेरा आक्रमक; Suleman Khan Escape  प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर सवाल
Suleman Khan Escape Case: ड्यूटीवर असताना घरी झोपायला गेलेल्या हवालदाराचे निलंबन, सुलेमान पाचव्‍या दिवशीही बेपत्ताच

आजूबाजूला दुसरा कॉन्स्टेबल किंवा गार्ड नाही. ज्या व्यक्तीला अटक करण्यासाठी चार वर्षांहून अधिक काळ लागला. त्याच्याजवळ केवळ एकच कॉन्स्टेबल तुम्ही ठेवता, जेणेकरून तो बाहेर पडू शकेल किंवा पळून जाऊ शकेल, असे कार्लुस म्हणाले. गुन्हे शाखेकडे दाखल अनेक तक्रारी एफआयआर (FIR) म्हणून नोंदवल्या गेल्या नाहीत. काही राजकारण्यांना दिल्या जाणाऱ्या विक्री व्यवहारांशी तडजोड केली गेली असा संशय आहे, असेही ते म्‍हणाले.

'राहुल गुप्‍तांना ताबडतोब निलंबित करा,' आमदार फेरेरा आक्रमक; Suleman Khan Escape  प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर सवाल
Suleman Khan Escape Case: राजकीय वातावरण तापलं! सुलेमानचा Video विरोधकांकडे कसा पोहोचला? पालेकरांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांची या प्रकरणात कोणतीही भूमिका नसेल आणि त्यांना सत्य हवे असेल तर त्यांनी प्रत्येक तक्रार प्राप्त झाल्यापासून जमीन हडपण्याच्या प्रकरणांमध्ये एसआयटी/गुन्हे शाखेकडून अवलंबिल्या जात असलेल्या कार्यपद्धतीची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. तसेच सिद्दीकी प्रकरणाची देखील चौकशी करावी.

- कार्लुस फेरेरा, आमदार (काँग्रेस)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com