Suleman Khan Arrested Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan Arrested: "गोयेंकारांक भिवपाची गरज ना!!" सुलेमान खानला अखेर अटक, मुख्यमंत्र्यांनी घटनाक्रमच सांगितला

CM Sawant on Suleman Khan Arrest: सुलेमान खान याला दोन दिवसांपूर्वीच अटक झाली असून आज त्याला गोव्यात आणलं जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत

Akshata Chhatre

जमीन बळकाव प्रकरणात गुंतलेला कुविख्यात ठग, गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या तावडीतून निसटलेला सुलेमान पुन्हा पोलिसांच्या हाती लागला असल्याची माहिती सोमवारी (२३ डिसेंबर) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केली. सुलेमान खान याला दोन दिवसांपूर्वीच अटक झाली असून आज त्याला गोव्यात आणलं जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

सुलेमान खान याला कोठडीतून पळून जायला मदत केलेल्या कॉन्स्टेबल अमित नाईक याच्या जामीन प्रकरणात तसेच सुलेमान खान हा पूर्ण सफाईने कोठडीतून फरार होण्यामागे सरकारचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. आता सुलेमान खान याला बेड्या ठोकण्यात आल्या असून तो त्याला पुन्हा गोव्यात आणलं जाईल असं म्हणत मुख्यमंत्री सावंत यांनी विरोधी पक्षांना सडेतोड उत्तर दिलं. सुलेमान खानचं नाव घेऊन वावरणाऱ्या लोकांना आता पोलिसांची शक्ती काय आहे याचा अंदाज आला असावा असं मुख्यमंत्री म्हणालेत.

सुलेमान सारख्या अट्टल आरोपीला पुन्हा एकदा तावडीत घेणारं माझं सरकार आहे, त्याला आम्ही दोन दिवसांपूर्वीच अटक केली होती मात्र आज आम्ही ही माहिती उघड करतोय, कारण त्याला केरळमध्ये अटक करण्यात आली असल्याने केरळ सरकार सोबत काही कागदपत्रांचं काम बाकी होतं अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

आत्तापर्यंत ज्यांनी सरकारला यासाठी जबाबदार ठरवलं त्यांना सडेतोड उत्तर मिळालं आहे. सुलेमान खान कुणी मोठा प्रतिष्ठित माणूस असल्याप्रमाणे आव आणत काही लोकं गेले काही दिवस वावरत होती त्या सर्वांना आणि सुलेमान खानच्या पलायनानंतर चुकीची माहिती पसरवणाऱ्यानां आता सर्व उत्तरं मिळतील असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील लोकांना न घाबरण्याचे तसेच असे चोर माझ्या हातून कधीही सुटणार नाही असे आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT