Panaji  Dainik Gomantak
गोवा

स्‍मार्ट सिटी पणजीसाठी सुकाणू समिती स्‍थापन करणार; महापालिकेच्‍या बैठकीत निर्णय

महापालिकेच्‍या बैठकीत माहिती : पावसाळापूर्व कामांसह विविध विषयांवर चर्चा

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी महापालिकेच्या बैठकीत स्‍मार्ट सिटी पणजीसाठी सुकाणू समिती स्‍थापन करण्यात येणार असल्‍याची माहिती देण्यात आली. बैठकीत पावसाळापूर्व कामांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. (Sukanu committee to be set up for Smart City Panaji)

स्‍मार्ट पणजीचे काम पुढे नेण्यासाठी सुकाणू समिती स्‍थापन करण्यात येणार आहे. समितीच्‍या अध्यक्षपदी महापालिकेचे आयुक्‍त असतील. तसेच यात दोन नगरसेवक, अन्न व औषध प्रशासन, आरोग्‍य खात्‍यातील प्रत्‍येकी एक अधिकारी, महापालिकेचे दोन निरीक्षक, अभियंता विभागातील प्रतिनिधी, पर्यटन खात्‍याचा अधिकारी आणि हॉटेल व रेस्‍टॉरंट असोसिएशनचा एक प्रतिनिधी यांचा सहभाग असेल, असे महापौर रोहित मोन्‍सेरात यांनी सांगितले.

या बैठकीला माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो, उदय मडकईकर, नगरसेविका रुथ फुर्तादो, उपमहापौर संजीव नाईक, नगरसेवक प्रमेश माईणकर, कबीर मखिजा पिंटो, आदिती चोपडेकर, बेंटो लॉरेन, आयुक्‍त आग्‍नेल फर्नांडिस आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्‍थित होते. बैठकीत 15 ठराव मंजूर करण्यात आले.

उदय मडकईकर यांनी सांत ईनेज येथील मुस्‍लिम स्‍मशानभूमीचा प्रश्‍न उपस्‍थित केला. याठिकाणी सुरुवातीला अंतिम संस्‍कारावेळी नमाज अदा केली जात होती. आता नियमितपणे नमाज अदा केली जाते. नमाजावेळी या परिसरात वाहतूक कोंडी होते. याबद्दल नागरिकांसह मुस्‍लिम बांधवांनीही तक्रारी केल्‍या आहेत. अंतिम संस्‍कारावेळी नमाज पडण्यास हरकत नाही. पण इतरवेळी नमाजाविषयी विचार करावा, अशी सूचना मडकईकर यांनी केली.

या बैठकीत शहरांतील वाढते भिकारी आणि रस्‍त्‍याच्‍या बाजूला उभारले जाणारे गाडे यावर चर्चा सुरू असताना गोंधळ झाला. मडकईकर आणि फुर्तादो यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सिग्‍नलला वाहन थांबताच भिकारी वाहनाच्‍या खिडकीतून हात पुढे करतात. त्‍यांना खायला किंवा जेवायला दिले तर ते घेत नाहीत. त्‍यांना पैसेच हवे असतात, अशी माहिती मडकईकर यांनी दिली. तर शहरात विखुरलेले खाद्यपदार्थांचे विक्रेते संबंधित परिसरात कचरा करतात, अशी तक्रार फुर्तादो यांनी केली.

शहरातील वाहतूक सिग्‍नल परिसरात फिरणाऱ्या भिकाऱ्यांचा प्रश्‍न यावेळी उपस्‍थित करण्यात आला. यावर आळा घालण्याची सूचना करण्यात आली. सुरेंद्र फुर्तादो यांनी शहरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या खाद्यपदार्थांच्‍या गाड्यांसाठी ''खाऊ गल्ली'' सुरू करावी, अशी सूचना केली. यासाठी मिरामार, करंझाळे, महावीर उद्यान अशा ठिकाणी ''खाऊ गल्ली'' सुरू करण्यास हरकत नाही, असे फुर्तादो म्‍हणाले.

या बैठकीत पावसाळापूर्व कामे कधी होणार, असा सवाल उदय मडकईकर यांनी उपस्‍थित केला. कामे सुरू असून कामगारांची संख्या अपुरी असल्‍याचे सांगण्यात आले. कामगारांचा तुटवडा असेल तर पावसाळापूर्ण कामे तसेच नियमित कामे कशी होणार, असेही ते म्‍हणाले. नियमित कामे करण्यासाठी प्रत्‍येक प्रभागात दोन कामगारांची नियुक्ती करावी, अशी सूचना त्‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT