बोंडला प्राणीसंग्रहालयालात नवीन वाघाची जोडी येणार?

सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) वाघाच्या जोडीसाठी बंदिस्त जागेची व्यवस्था केली आहे.
Pair of tigers
Pair of tigers Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील एकमेव बोंडला प्राणीसंग्रहालयात यंदा वाघाच्या नव्या जोडीचे स्वागत होण्याची शक्यता आहे. नागपूर-महाराष्ट्रातील रेस्क्यू सेंटरमधून प्राण्यांची नवीन जोडी येथे आणण्यासाठी वन विभागाने सरकारकडे मंजुरी मागितली आहे. (Bondla zoo to get new pair of tigers in goa)

Pair of tigers
दिव्यांगांना सरकारी नोकऱ्यांत आरक्षण देणार: सुभाष फळदेसाई

सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) वाघाच्या जोडीसाठी बंदिस्त जागेची व्यवस्था केली आहे. याबबात बोलताना मुख्य वन्यजीव वॉर्डन संतोष कुमार म्हणाले की, "हा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात आला आहे. पुढे केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची (सीझेडए) परवानगी घेतली जाईल."

Pair of tigers
सहा महिन्यांत मंत्र्यांसह सरकारचे रिपोर्ट कार्ड बनणार

नागपुरातील एका प्राणिसंग्रहालयाने बायसनच्या जोडीच्या बदल्यात वाघाची जोडी देण्याचे मान्य केले आहे. आम्ही आता सरकारी संमती आणि नंतर CZA च्या होकाराची वाट पाहत आहोत. बहुधा, आम्हाला यावर्षी आमच्या प्राणीसंग्रहालयात वाघाची जोडी येईल,” कुमार म्हणाले.

बोंडला प्राणिसंग्रहालयाने अनुक्रमे डिसेंबर 2016 आणि जुलै 2017 मध्ये प्राणिसंग्रहालयाचे प्रमुख आकर्षण असलेल्या राणा आणि संध्या या वाघांच्या पूर्वीच्या जोडीला गमावले. दोन्ही प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणास्तव झाला होता. 2009 मध्ये विशाखापट्टणमच्या इंदिरा गांधी प्राणीशास्त्र उद्यानातून ही जोडी आणण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com