Sanjivani Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory: सरकारने इथेनॉल धोरण तातडीने स्पष्ट करावे; ऊस उत्पादकांचे धरणे आंदोलन

Sanjivani Sugar Factory: महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांचाही पाठिंबा

दैनिक गोमन्तक

Sanjivani Sugar Factory: मागील कित्‍येक महिन्‍यांपासून संजीवनी साखर कारखाना बंद असून गोव्यातील ऊस उत्पादक हवालदिल झाले आहेत. मध्यंतरीच्या काळात संजीवनी प्रकल्पात इथेनॉल प्रकल्प सुरू करणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते, पण त्यासंबंधी अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

सरकारला इथेनॉल प्रकल्प सुरू करायचा आहे की नाही, यासंबंधी कोणतेच स्पष्टीकरण ऊस उत्पादकांना दिले जात नाही. त्यामुळे सरकारने इथेनॉल धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी करत आज संजीवनीच्या फाटकासमोर ऊस उत्पादकांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांनीही पाठिंबा दिला आहे.

तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच

सरकारच्या या आडमुठ्या धोरणामुळे ऊस उत्पादकांची गोची झाली असून पुढील पीक घ्यायचे की नाही, यासंबंधी संभ्रम निर्माण झाला आहे. ऊस उत्पादक जिवंत रहावा असे जर सरकारला वाटत असेल, तर संजीवनीत ऊस गाळप करणार की इथेनॉल प्रकल्प सुरू करणार हे आधी सांगावे, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे काय झाले?

गेल्या वर्षी ऊस उत्पादकांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली, त्यात इथेनॉल प्रकल्पावर सरकारने भर दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्या आश्वासनाचे पुढे काय झाले? असा सवाल ऊस उत्पादकांनी या निदर्शनावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

SCROLL FOR NEXT