Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Digambar Kamat vegetable vendors: मडगावातील महिला भाजी विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.
Digambar Kamat vegetable vendors
Margao Vegetable VendorsDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगावातील महिला भाजी विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. या महिला भाजी विक्रेत्यांनी शुक्रवारी मंत्री कामत यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या.

या महिला केपे, बाळ्ळी, मोरपिर्ला, काणकोणसारख्या डोंगराळ भागातून स्वतः उगवलेले पीक घेऊन विक्रीसाठी मडगावात येतात. त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी व कर्तव्य आहे, असेही मंत्री कामत यांनी सांगितले. त्यांनी या महिलांना ओळखपत्रेदेखील द्यावीत, अशी सूचना केली.

Digambar Kamat vegetable vendors
Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

पालिका इमारतीमागे शेड उभारणार

मडगावमधील या महिलांना फळभाजी विकण्यासाठी कायमस्वरूपी जागा मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न आहे. पालिका इमारतीमागे, जिथे हायड्रॉलिक पार्किंगचा प्रकल्प उभारला जाईल, तिथेच शेड बांधून त्यांची व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com