Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

Rooftop Solar Subsidy: राज्यात छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांना मोठी चालना देण्यासाठी सरकारने ‘ग्रिड-कनेक्टेड रूफटॉप सोलर प्रमोशन योजना’ अधिसूचित केली आहे
Rooftop Solar Subsidy
Goa Rooftop Solar SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांना मोठी चालना देण्यासाठी सरकारने ‘ग्रिड-कनेक्टेड रूफटॉप सोलर प्रमोशन योजना’ अधिसूचित केली आहे. ही योजना १ एप्रिल २०२६ पासून लागू करण्यात आली असून, ३१ मार्च २०२८ पर्यंत दोन वर्षे अस्तित्वात राहणार आहे. गोवा ऊर्जा विकास संस्था अर्थात जीईडीएमार्फत योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या योजनेत घरगुती ग्राहकांना १ ते १० किलोवॅट क्षमतेपर्यंत राज्य आर्थिक सहाय्य मिळणार आहे. १ किलोवॅटसाठी २० हजार रुपये, २ किलोवॅटसाठी ४० हजार रुपये, ३ किलोवॅटसाठी ६२ हजार ५०० रुपये आणि ५ किलोवॅटसाठी १ लाख ७ हजार ५०० रुपये अशीमदत आहे. १० किलोवॅट क्षमतेसाठी कमाल २ लाख २० हजार रुपयांपर्यंत राज्य आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

Rooftop Solar Subsidy
Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याण संघटनांना ९० किलोवॅटपर्यंत प्रतिकिलोवॅट २२ हजार ५०० रुपये, तर शैक्षणिक संस्थांनाही ९० किलोवॅटपर्यंत समान दराने मदत दिली जाणार आहे. व्यापारी, औद्योगिक आणि अन्य आस्थापनांसाठी ९० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान किंवा प्रति किलोवॅट ९ हजार रुपये अशी तरतूद आहे.

Rooftop Solar Subsidy
Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

आतापर्यंत २,५०८ ग्राहकांनी घेतला लाभ

योजनेचे एकूण लक्ष्य ६५ मेगावॅट आहे. आतापर्यंतच्या योजनेत २,५०८ ग्राहकांनी लाभ घेतला असून, सुमारे ८७ मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्याचे सरकारने नमूद केले आहे. नवीन योजनेत अनुदान ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम’ या तत्त्वावर दिले जाणार असून केंद्राचे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाल्यानंतर पाच कामकाजाच्या दिवसांत राज्य अनुदान देण्याची तरतूद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com