Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

Tyson Jammu Kashmir Operation: लष्करी मोहिमेत अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या ‘‘टायसन’’ या लष्करी श्वानाला यंदा ‘मेन्शन-इन-डिस्पॅचेस’ सन्मानाने गौरवण्यात येणार आहे.
Tyson Jammu Kashmir Operation
Military Dog TysonDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: लष्करी मोहिमेत अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या ‘‘टायसन’’ या लष्करी श्वानाला यंदा ‘मेन्शन-इन-डिस्पॅचेस’ सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरमधील एका लष्करी मोहिमेदरम्यान टायसनने दाखवलेल्या धाडसाबद्दल हा बहुमान जाहीर झाला आहे.

‘२ पॅरा’ (स्पेशल फोर्सेस) मधील हा जर्मन शेफर्ड प्रजातीचा हा श्वान ‘रिमाऊंट व्हेटर्नरी कोअर’चा भाग आहे. ‘ऑपरेशन रक्षक’ अंतर्गत केलेल्या कामगिरीसाठी त्याला हा लष्करी सन्मान देण्यात आला आहे. लष्कराच्या विविध मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या ७५ जवानांच्या विशेष उल्लेख असलेल्या ‘मेन्शन-इन-डिस्पॅचेस’ यादीत टायसनचा समावेश आहे. या जवानांनी ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’, ‘ऑपरेशन मेघदूत’, ‘ऑपरेशन रक्षक’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांचा समावेश आहे.

Tyson Jammu Kashmir Operation
Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

‘व्हाईट नाईट्स कोअर’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन त्रशी-१’ दरम्यान टायसनने दहशतवाद्यांच्या अड्ड्यात शिरताना पहिली गोळी स्वतःवर झेलली. जखमी झाल्यावरही त्याने मागे न हटता दहशतवाद्यांवर हल्ला चढवला. त्याच्या या धाडसामुळेच दहशतवाद्यांचे स्थान निश्चित झाले. यामुळे लष्कर, पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांना तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान करणे शक्य झाले.

Tyson Jammu Kashmir Operation
Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

टायसनने आपल्या कर्तव्याप्रति असलेली निष्ठा सिद्ध केली असून, तो खऱ्या अर्थाने एक योद्धा असल्याचे लष्कराने म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी संरक्षण दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील जवानांसाठी ७८ शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली होती. यामध्ये १३ मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com