MGP BJP Alliance Dainik Gomantak
गोवा

MGP BJP Alliance: 'सन्मान मिळाला तरच युती कायम'; भाजपला सत्ता हवी असेल तर मगोपला सोबत घ्यावेच लागेल, सुदिन ढवळीकरांचा इशारा

Sudin Dhavalikar MGP BJP Alliance: भाजपला विधानसभेत २१ किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकून सत्ता स्थापन करायची असेल, तर मगोपला बरोबर घ्यावेच लागेल.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: भाजपला विधानसभेत २१ किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकून सत्ता स्थापन करायची असेल, तर मगोपला बरोबर घ्यावेच लागेल. मगोपला भाजपकडून योग्य सन्मान मिळाला तरच युती पुढे कायम राहील, अन्यथा पक्ष आपली ताकद दाखवून देईल, असा इशारा मगोप नेते तथा वीजमंत्री सुदिन यांनी दिला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील इशारा दिला आहे. आगामी विधानसभेत मगोप-भाजप युती राहिली, तर २३ पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यात पक्षाचे कार्यकर्ते काम करतील, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक नेता आणि पक्ष आपापल्या जागी महत्त्वाचा असतो आणि गोव्यातील जनतेने प्रत्येकाला त्यांची योग्य जागा दाखवून दिली आहे, असेही ढवळीकर यांनी नमूद केले आहे

भाजप आणि मगोप यांच्यातील युती ही केवळ गोव्यापुरती मर्यादित नाही, तर ती थेट केंद्रीय स्तरावर निश्चित झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या युतीचा निर्णय झाला होता. मगोपकडून सध्या विविध मतदारसंघात उमेदवारांचा शोध सुरू आहे.

मगोच्या उमेदवारामुळेच यापूर्वी २००८ साली पाळी मतदारसंघात प्रमोद सावंत यांचा पराभव झाला होता, याची आठवणही ते करून देतात. पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण क्षमतेने सक्रिय झाले, तर गोव्यात इतर कोणत्याही पक्षाला वाव राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT