Goa Politics: 'जनतेच्या नावावर राजकीय मागणी लादू नका'; विरोधकांच्या ऐक्याच्या भूमिकेवर भाजपचा माणिकराव ठाकरे यांच्यावर निशाणा

Goa Assembly Election: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या संभाव्य ऐक्यावरून गोव्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
Goa Assembly Election
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या संभाव्य ऐक्यावरून गोव्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्याची मागणी ही ‘जनतेचा आवाज’ असल्याचे म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप गोवा समाज माध्यम विभागाचे प्रभारी शुभम पार्सेकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘विरोधकांनी एकत्र यावे, अशी मागणी तुम्ही जनतेच्या नावावर करीत आहात. प्रत्यक्षात भाजपचा स्वतंत्रपणे सामना करण्याची इच्छा नसल्यामुळेच विरोधकांच्या ऐक्याची गरज व्यक्त केली जात आहे,’ असा दावा पार्सेकर यांनी केला.

Goa Assembly Election
Goa Congress: पाटकर-विरियातोंची काँग्रेस समितीच्या बैठकीकडे पाठ; समित्यांमध्ये स्थान देऊनही मनधरणी करण्यात नेतृत्वाला अपयश

भाजपला मतदान करायचे नसेल, तर मतदारांना त्यांचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे जनतेला विरोधी आघाडी हवी आहे, असे चित्र निर्माण करण्याची गरज नाही, असेही पार्सेकर यांनी म्हटले आहे. एखाद्या पक्षाला स्वतःच्या बळावर निवडणूक लढविण्याचा आत्मविश्वास असेल, तर त्याने स्वतंत्रपणे मैदानात उतरावे आणि जनतेचा कौल स्वीकारावा, असे आव्हान त्यांनी दिले.

पार्सेकर यांच्या भूमिकेतील प्रमुख मुद्दे

विरोधी ऐक्याची मागणी ही पक्षांची राजकीय भूमिका असू शकते.

ती ‘जनतेची मागणी’ म्हणून मांडण्यास भाजपचा आक्षेप.

भाजपला नाकारायचे असल्यास मतदारांना मतदानातून निर्णय घेण्याचा अधिकार.

पक्षांना स्वतंत्रपणे निवडणूक लढवून जनतेचा कौल घेण्याचे आव्हान.

आगामी निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या संभाव्य ऐक्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात.

Goa Assembly Election
Goa Politics: आघाडीसाठी काँग्रेसची कवाडे खुली; भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्धार, राज्यभर 'गोवा रक्षण यात्रा'

‘जनतेचा आवाज’ म्हणण्यावर आक्षेप

विरोधकांच्या ऐक्याची राजकीय मागणी ही संबंधित पक्षांची भूमिका असू शकते. मात्र, ती जनतेची मागणी म्हणून मांडणे योग्य नाही, असा मुद्दा पार्सेकर यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com