Valpoi Accident Dainik Gomantak
गोवा

Valpoi Accident: अचानक बैल आडवा आला, अन कार झाली पलटी; वाळपईत अपघात

सुदैवाने कारचालक सुखरूप

गोमंतक ऑनलाईन टीम

Valpoi Accident: वाळपई ठाणे मार्गावर बैल आडवा आल्याने एका कारचा अपघात झाला आहे. मुख्य रस्त्यावर अचानक बैल आडवा आल्याने ही कारच्या ड्रायव्हरला कारवर नियंत्रण राखणे जमले नाही. त्याने गाडी वळवली त्यामुळे रस्त्याशेजारील झाडाला कारची जोरदार धडक बसली आणि कार रस्त्यावर पलटी झाली.

सुदैवाने या अपघातात कारचालक सुखरूप आहे. तथापि, कारचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी समोरून कोणतेही वाहन येत नव्हते, नाहीतर मोठा अपघात झाला असता.

पाली सत्तरी येथील सतीश गावकर हा वाळपईहून पालीमार्गे चालला होता. तेव्हा वेळुस येथे अब्बास शेख यांच्या घराजवळ असलेल्या वळणावर हा अपघात झाला.

हा रस्ता अरूंद आहे. त्यामुळे वळणावर दुसऱ्या बाजूने येणारी वाहने दिसत नाहीत. शिवाय सध्या सत्तरी तालुक्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळेही अपघाताला निमंत्रण मिळू शकते. त्या पार्श्वभुमीवर गाडी सावकाश चालविण्याचे आवाहन केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT