Wade Lake Water Dainik Gomantak
गोवा

वाडे तळ्यातील पाणी दूषित होण्‍यास ‘सुडा’ जबाबदार

जलसंपत्ती संकटात: नाल्‍याची रुंदी कमी केल्‍याने उद्‌भवतेय समस्‍या

दैनिक गोमन्तक

वास्को: दाबोळी वाडे तळ्याचे पाणी दूषित होण्‍यास ‘सुडा’चे कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांतून करण्‍यात येत आहे. तळ्याचे पाणी पूर्वी वाडे समुद्रात योग्यरीत्या जात व येत होते. यामुळे पाणी व तळ्यातील प्राण्‍यांचे जीवन व्‍यवस्‍थित चालायचे. पण सौंदर्यीकरणाचे काम करताना तळ्याचे पाणी समुद्रात जाणाऱ्या नाल्याची रुंदी कमी केल्याने पाणी दूषित होण्याचे प्रकार घडत आहेत. यासाठी ‘सुडा’ने पुन्हा एकदा

वाडे तळ्यातील पाणी ज्या नाल्यातून समुद्रात जाते त्याची दुरुस्ती हातात घ्यावी, अन्यथा पाणी आणखी दूषित होऊन संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरणार असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

मुरगाव नगरपालिका प्रभाग 14 मधील वाडे तळ्याचे सौंदर्यीकरण केल्यानंतरसुद्धा अनेक त्रुटी उद्भवल्या होत्या. पण ‘सुडा’ने यावर कधीच दुरुस्ती करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. यामुळे गेली तीन वर्षे तळ्यातील पाणी दूषित होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. तसेच वाडे तळ्यातील पाण्याचा प्रवाह समुद्रात योग्यरीत्या होत नसल्याने तळ्यातील मासे मृतावस्थेत आढळत आहेत.

तळ्यातील जनजीवन व्यवस्थित ठेवण्यासाठी पाणी समुद्रात जाण्यासाठी नाल्यातील गाळ उपसावा व अरुंद झालेला नाला पुन्हा रुंद करावा. तेव्हाच तळ्यातील जनजीवन व्यवस्थित राहील. यासाठी संबंधित विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी योग्य पावले उचलावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT