Govind Gawde  Dainik Gomantak
गोवा

गोविंद गावडे यांची अशीही कार्यतत्परता

जखमीवर उपचार: अपघातानंतर लगेच गतिरोधकावर ओढले पांढरे पट्टे

दैनिक गोमन्तक

खांडोळा: अपघात किंवा दुर्घटनेनंतर लगेच साहाय्य मिळणे, तेही लोकप्रतिनिधींकडून हा प्रकार सध्याच्या काळात दुर्लभच. मात्र, याला प्रियोळचे आमदार तथा मंत्री गोविंद गावडे हे मात्र अपवाद ठरले आहेत. खांडोळा येथे नव्याने उभारलेला गतिरोधक न दिसल्यामुळे एका दुचाकीस्वाराला अपघात झाला. हे वृत्त समजताच गावडे भर कार्यक्रमातून घटनास्थळी गेले आणि जखमीला उपचारासाठी पाठवले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. पांढरा रंग घेऊन त्यांनी स्वत: गतिरोधकावर पट्टेही ओढले. गोविंद गावडे यांच्या या तत्परतेबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सविस्तर वृत्त असे, की आमोणा पुलाजवळ खांडोळाच्या बाजूला रविवारी संध्याकाळी नव्याने उभारलेल्या गतिरोधकावर पांढरे पट्टे ओढले नसल्यामुळे आमोणा येथील दुचाकीस्वार विशांत भगत यांना अपघात झाला. त्यात ते जखमी झाले. ही घटना एका कार्यक्रमास उपस्थित असलेले मंत्री गोविंद गावडे यांना समजली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन विशाल यांना उपचारासाठी इस्पितळात पाठवले.

गतिरोधकावर पांढरे पट्टे नसल्यामुळे अपघात झाला, हे समजताच गावडे यांनी खांडोळाचे सरपंच दिलीप नाईक यांच्या सहकार्याने माशेलातून पांढरा रंग व ब्रश व इतर साहित्य त्वरित मागवले आणि अवघ्या अर्ध्या तासात गतिरोधकावर स्वतः पांढरे पट्टे ओढले. त्यांना दिलीप नाईक यांच्यासह स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.

कौतुकाचा वर्षाव

कोणतेही काम असो, ते तातडीने पूर्ण करण्याकडे गावडे यांचा कल असतो. त्यामुळेच आज गावडे यांनी सरकारी यंत्रणेची वाट न पाहता पुन्हा अपघात होऊ नये म्हणून स्वत:च गतिरोधक रंगवले. यामुळे जनतेसाठी झटणारे मंत्री गावडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमात भाषण देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी समस्या सोडवली, असे लोक याप्रसंगी म्हणत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT